पुण्यात दोन गटामध्ये तुफान हाणामारी, 4 दुचाकी जाळल्या

पुण्यात दोन गटामध्ये तुफान हाणामारी, 4 दुचाकी जाळल्या

हांडेवाडी इथं दोन गटांमध्ये भररस्त्यावर तुफान हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली.

  • Share this:

वैभव सोनवणे, प्रतिनिधी

पुणे, 02 जानेवारी :  सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच प्रमाण वाढत चालले आहे.  पुण्यातील हांडेवाडीमधील दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली. यामध्ये 5 ते 6 जण जखमी झाले असून हांडेवाडीतील मयुर पार्क सोसायटीजवळ हा प्रकार घडलाय.

हांडेवाडी इथं दोन गटांमध्ये भररस्त्यावर तुफान हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली.  या वादातून चार दुचाकी जाळण्यात आल्यात. या घटनेत 5 ते 6 जण जखमी झाले आहे.  या राड्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

लोणावळ्यामध्ये  घरात घुसून 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या

दरम्यान, लोणावळ्यामध्ये चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराने एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

रेशमा पुरुषोत्तम बंसल (वय 70) असं मृत महिलेचं नाव आहे. मयत रेश्मा या आपल्या पतीसोबत मागील अनेक वर्षांपासून लोणावळ्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या द्वारकामाई सोसायटीमध्ये राहतात. दररोज त्या नित्यनियमाने आपल्या पतीला जेवणाचा डबा देण्यासाठी दुकानावर जात असतात.

परंतु, आज त्या गेल्या नसल्यानं त्यांचे पती पुरुषोत्तम हे जेवण्यासाठी घरी आले असता घरातील पॅसेजमध्ये रेश्मा या बेशुद्ध अवस्थेत त्यांना आढळल्या. त्यानंतर त्यांनी शेजारी राहणाऱ्या रहिवाशांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.

स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर दाखल झाले. घराची पाहणी केली असता घरातील साहित्य इतरत्र पसरलेले आढळून आले. तसंच मौल्यवान दागिने चोरीला गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार, पोलिसांनी चोरीच्या उद्देशाने वयोवृद्ध महिलेचा खून झाला असल्याबाबतची तक्रार दाखल केली आह आहे.

परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे लोणावळा शहर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Published by: sachin Salve
First published: January 2, 2020, 9:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading