Home /News /news /

'सांगा कसं जगायचं?' पुण्यात पुराच्या पाहणीदरम्यान खासदार सुप्रिया सुळेंसमोर ओक्साबोक्शी रडली महिला

'सांगा कसं जगायचं?' पुण्यात पुराच्या पाहणीदरम्यान खासदार सुप्रिया सुळेंसमोर ओक्साबोक्शी रडली महिला

या महिलेला खासदार सुप्रिया सुळे यांना धीर दिला आणि महापालिका आणि आयुक्तांशी बोलून प्रश्न सोडवण्याचे आश्वासनही दिलं.

    मुंबई, 15 ऑक्टोबर : पुण्यासह दक्षिण महाराष्ट्रात बुधवारपासून झालेल्या पावसानं शेतकरी आणि नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, रस्ते जलमय झाले तर गाड्या वाहून गेल्या. शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं अतोनात नुकसान झालं. पुण्यातील ही पूरस्थिती पाहण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे पोहोचल्या त्यावेळी महिला आणि नागरिकांनी त्यांच्यासमोर आल्या समस्या ठेवल्या. सांगा गरिबांनी कसं जगायचं? दोन वर्षांत अनेक संकटं आली. लहान मुलं आहेत सोबतीला. काही ना काही अडचणी येत आहेतच. याची जबाबदारी कोण घेणार? भिंत कोसळल्यानं घरांमध्ये पाणी शिरलं आणि मोठं नुकसान झालं. असं म्हणत ही महिला जोरजोरात रडू लागली. या महिलेला खासदार सुप्रिया सुळे यांना धीर दिला आणि महापालिका आणि आयुक्तांशी बोलून प्रश्न सोडवण्याचे आश्वासनही दिलं. लोहगाव भागात पार्किंगमध्ये वाहनं बुडाली मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं तर दुसरीकडे चंदननगर पोलीस ठाण्यात पाणी घुसलं आहे. दत्तवाडी भागात घरांमध्ये पाणी घुसल्यानं नागरिकांचे हाल झाले तर दगडूशेठ गणपती मंदिर परिसरातही पुराचं पाणी आलं. एका रात्रीत झालेल्या मुसळधार पावसानं जवळपास निम्म पुणे पाण्याखाली गेलं होतं. अनेकांच्या घरात गुडघ्या एवढं पाणी तर कुठे गाड्या वाहून गेल्या आहेत. पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यासह राज्यातील अतिवृष्टीचा आढावा घेतला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Supriya sule

    पुढील बातम्या