S M L

पुण्यात सनबर्न फेस्टिवल काम ग्रामस्थांनी बंद पाडलं

पुण्याजवळील बावधन आणि लवळे परिसरात सनबर्न फेस्टिवलचं काम ग्रामस्थांनी बंद पाडलं, 'सनबर्न'साठी या भागात अनेक डोंगराचं सपाटीकरण केलं जात होतं. मोशी आणि पुण्यातून रद्द करण्यात आलेला सनबर्न फेस्टिवल आमच्या हद्दीत नको, अशी भूमिका तिथल्या ग्रामस्थांची घेतलीय, तशा ठरावच बावधन आणि लवळे ग्रामपंचायतीने मंजूर करून घेतलाय.

Chandrakant Funde | Updated On: Dec 15, 2017 04:44 PM IST

पुण्यात सनबर्न फेस्टिवल काम ग्रामस्थांनी बंद पाडलं

15 डिसेंबर, पुणे : पुण्याजवळील बावधन आणि लवळे परिसरात सनबर्न फेस्टिवलचं काम ग्रामस्थांनी बंद पाडलं, 'सनबर्न'साठी या भागात अनेक डोंगराचं सपाटीकरण केलं जात होतं. मोशी आणि पुण्यातून रद्द करण्यात आलेला सनबर्न फेस्टिवल आमच्या हद्दीत नको, अशी भूमिका तिथल्या ग्रामस्थांची घेतलीय, तशा ठरावच बावधन आणि लवळे ग्रामपंचायतीने मंजूर करून घेतलाय.

तरूणाईचा हा संगीत महोत्सव गेल्यावर्षी पुण्याजवळच्या लोणीकंद इथं आयोजित करण्यात आला होता. गेल्यावर्षी तिथंही सनबर्नच्या आयोजनावरून काही वाद निर्माण झाले होते. यंदाही हा फेस्टिवल वादात सापडण्याची शक्यता निर्माण झालीय. या फेस्टिवल माध्यमातून गोव्यामध्ये ड्रग्जची छुपी विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून हा फेस्टिवल पुणे परिसरात आयोजित केला जातोय. पण इथंही या सनबर्न फेस्टिवलला विरोध होताना दिसतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2017 04:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close