एकविरा देवीचा कळस सापडला, 'या' गाण्यावरून आरोपींनी कळसावर मारला डल्ला!

एकविरा देवीचा कळस सापडला, 'या' गाण्यावरून आरोपींनी कळसावर मारला डल्ला!

3 ऑक्टोबर 2017 रोजी पंचधातूंचा अडीच किलो वजनाचा 1 लाख रुपये किंमतीचा कळस चोरीला गेला होता.

  • Share this:

पुणे, 07 मे : लोणावळाजवळील कार्ला येथील प्रसिद्ध एकविरा देवीचा कळस 2017 मध्ये चोरीला गेला होता. तो पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोधण्यात आला आहे.  पुणे ग्रामीण पोलिसांकडून कळसाच्या चोरीचा गुन्हा उघडकीस करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

3 ऑक्टोबर 2017 रोजी पंचधातूंचा अडीच किलो वजनाचा 1 लाख रुपये किंमतीचा कळस चोरीला गेला होता. तेव्हापासून यासंदर्भात पोलिस तपास सुरू होता. अखेर पुणे ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे. या गुन्ह्याची अधिकृत माहिती देण्यासाठी पुणे पोलिसांकडून मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये आरोपींचीही माहिती देण्यात आली.

हेही वाचा : निर्लज्जपणा, निवडणुकीमुळे सामूहिक बलात्काराची घटना 4 दिवस दाबून टाकली!

राहुल भागवत गावंडे आणि सोमनाथ अशोक गावंडे अषा 2 आरोपींना एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. दोघेही आरोपी  धामणगाव आवारी तालुक्यातील अकोला जिल्हा अहमदनगर येथील आहेत. आपण कळस चोरला असल्याची कबुली आरोपींकडून देण्यात आली आहे.

तर मंदिराच्या परिसरात जंगल आहे तिथं कळस लपवून ठेवण्यात आला होता. आरोपींनी कळस विकण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांना शक्य झालं नाही. अशी माहितीही पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे. दरम्यान, 'आई तुझा सोन्याचा कळस' हे गाणं ऐकल्यानंतर आरोपींनी कळसाकडे पाहिलं आणि नंतर लालचेपोटी त्यांनी कळस चोरला. असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

खरंतर, कार्ला हे अत्यंत प्रतिष्ठित देवस्थान असल्यानं या चोरीने खळबळ माजली होती. कार्ल्याची एकविरा देवी ही राज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिर बंद झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कळस चोरीला गेला होता. हा कळस पंचधातूपासून बनला असून त्याला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. पण तो कळस सोन्याचा असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

VIDEO: लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलं भाकीत

First published: May 7, 2019, 5:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading