पुणे, 12 ऑगस्ट : पुण्यात पोलिसांवरच कारवाई झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सपोनि अर्जुन घोडे पाटील आणि पोलिस नाईक हांडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पुणे अॅन्टी करप्शन ब्युरोने ही कारवाई केली आहे. पोलिसांवरच कारवाई केल्याच्या बातमीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्ह्यतील नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील आणि पोलीस नाईक धर्मात्मा हांडे यांच्यावर पुणे अॅन्टी करप्शन ब्युरोची कारवाई करण्यात आली आहे. नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच लाखाची मागणी केल्याने पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक सुनिल बिले, पोलीस हवालदार टिळेकर, पोलीस शिपाई थरकार, पोलीस शिपाई महाशब्दे यांच्या पथकाकडून कारवाई केली आहे.
आई नर्गिसनंतर संजय दत्तलाही कॅन्सरनं गाठलं; कॅन्सरला फाईट देणारे सेलेब्रिटीज
नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु असुन सपोनि घोडे पाटील यांच्या घराचीही तपासणी करण्याची कारवाई सुरु असल्याची माहिती पुणे अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिली. या प्रकरणात संशयीत सर्व पोलिसांची चौकशी केली जाणार असून घराची झडती घेतली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
लॉकडाऊनमध्ये पुण्यात फाईव्हस्टार हॉटेलात झालं लग्न, कोरोनाने दोघांचा मृत्यू
दरम्यान, पुण्यात तसं पाहायला गेलं तर गुन्ह्यांचं प्रमाण मोठं आहे. रोज पुण्यात धक्कादायक गुन्ह्यांच्या घटना घडतच आहेत. अशात पोलीसच जर तक्रारीसाठी पैशांची मागणी करत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी कुठे जायचं असा प्रश्न आहे.