हा आहे पुणे पोलिसांनी उघड केलेला माओवाद्यांचा 'मास्टर प्लॅन'

हा आहे पुणे पोलिसांनी उघड केलेला माओवाद्यांचा 'मास्टर प्लॅन'

देशाविरूद्ध युद्ध पुकारण्याचा त्यांचा कट होता असंही पुणे पोलिसांनी न्यायालयाला म्हटलं आहे. पोलिसांनी न्यायालयात अनेक धक्कादायक आणि खळबळजनक माहिती आणि पुरावे दिले आहे.

 • Share this:

वैभव सोनावणे, पुणे, ता. 29 ऑगस्ट : मंगळवारी अटक करण्यात आलेल्या माओवादी समर्थक नेत्यांना आज पोलिसांनी पुणे न्यायालयात हजर केलं आणि सर्वांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. माओवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला होता. रोड शोच्या दरम्यान घातपात घडवून राजीव गांधीची ज्या पद्धतीनं स्फोट घडवून हत्या करण्यात आली होती. त्याच पद्धतीने घातपात घडवून आणण्याचा माओवाद्यांचा कट होता अशी खळबळजनक माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. देशाविरूद्ध युद्ध पुकारण्याचा त्यांचा कट होता असंही पुणे पोलिसांनी न्यायालयाला म्हटलं आहे. पोलिसांनी न्यायालयात अनेक धक्कादायक आणि खळबळजनक माहिती आणि पुरावे दिले आहे.

हे आहे माओवाद्यांचं कारस्थान

 • अटक केलेले सर्व जण हे माओवाद्यांचे 'थिंक टँक'. शहरी भागात माओवादी विचार पेरणं हे या 'थिंक टँक'चं काम.

 • 'थिंक टँक'ने धोरणं तयार करायची आणि दुसऱ्या फळीने ती अमंलात आणायची अशी योजना. पुण्यातली एल्गार परिषद ही त्याच योजनेचा भाग.

 • विद्यार्थ्यांचं ब्रेनवॉश करून ते प्रोफेशनल क्रांतिकारी बनतील याची तयारी. विविध परिषदांमधून एवढे टोकाचे विचार मांडायचे की दंगलीला पोषक वातावरण निर्माण होईल.

 • नरेंद्र मोदी सरकारने विरोधी चळवळींना दडपून टाकण्याचं काम सुरू केलंय. माओवाद्यांची क्रांती अयशस्वी करण्यासाठी ऑपरेशन ग्रीन हंट 3 सुरू केलंय.

 • देशात अँटी फॅसिस्ट फ्रंट तयार करण्याचा प्रयत्न करण्याचा माओवाद्यांचा कट

 • भाकप माओवादी ही क्रांती करणारी एकमेव पार्टी आहे. त्यामुळे क्रांतीची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल.

 • गडचिरोलीच्या खोट्या एन्काऊंटरचा अभ्यास करण्यासाठी सत्य शोधन समिती बनवा आणि विद्यार्थ्यांना जोडून घ्या.

 • अरुण परेरा हा अनेक विद्यार्थी चळवळीत आपली विचारधारा रुजवण्याचा प्रयत्न करतोय ,विद्यार्थ्यांना चळवळीत घ्या त्यांना जंगलात पाठवून ट्रेनिंग द्या

 • मुंबई पुणे आणि आणखी शहरांमध्ये राजकीय खुनाचं (रोहित वेमुला प्रकरणासारखं) भांडवल करा.

 • या सगळ्यात वरवरा राव यांनी भूमिका फार मोठी. शस्त्रांच्या खरेदीचे सगळे अधिकार त्यांच्याकडे होते यावरून त्यांचा सहभाग स्पष्ट होतो

 • माओवाद्यांचा सर्वोच्च नेता कॉम्रेड गणपती याने वर्णन गोंसलविस याच्या भेटीसाठी वेळ मागितलीय. मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि कोकण भागात काही समर्थक निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न.

 • सुरेंद्र गडलिंग यांनी प्रकाश याना लिहिलेलं आणखी एक पत्र. वरवरा राव यांच्याकडून फंड आलाय ,आपण फॅक्ट फाईंडिंग कमिटी साठी ही फंड गोळा करतोय. पुढच्या कारवाई साठी जंगलातले कॉम्रेड संपर्कात आहेत.

 • पत्रात शस्त्र आणि दारुगोळा विकत घेण्याचा गरजांबाबत विचारणा. नेपाळच्या अरुण आणि वर्णन चा उल्लेख 4 लाख राऊंड ची मागणी करताना आला आहे.

 • ते घेण्यासाठी नेपाळमध्ये संपर्क केलाय आणि फक्त वरवरा राव यांना फक्त खरेदीसाठीचे बोलायचे अधिकार आहे त्यासाठी मणिपूर चे कॉम्रेड मदत करताहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2018 06:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading