VIDEO : वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांनो सावधान..!

VIDEO : वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांनो सावधान..!

चिंचवड शहरात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची आता थेट जेलमध्ये रवानगी केली जाणार आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी, 16 सप्टेंबर : चिंचवड शहरात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची आता थेट जेलमध्ये रवानगी केली जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीसाठीचा रस्ता आपली वडिलोपार्जित मालमत्ता समजणाऱ्यांनो जरा सावधान.

तुम्ही कितीही कॅम्पेन करा सार्वजनिक रस्ता ही आपली वडिलोपार्जित संपती असल्याच्या आवेशात वाहतूक नियमांची पायमल्ली करणारे महाभाग आपल्याकडे कमी नाहीत. याला पिंपरी चिंचवडही अपवाद नाहीय. पिंपरी चिंचवडमध्ये बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी खुद्द पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभनच रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांविरोधात थेट कलम 279 नुसार कारवाई सुरु करत, थेट जेलमध्ये रवानगी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

अर्थातच पोलीस आयुक्तांनी सुरु केलेल्या कारवाईचं नागरिकांनी स्वागतच केलंय. मात्र, असा जालीम उपाय करण्याआधी पोलीस आयुक्तांनी आपल्या यंत्रणाही तपासणं गरजेचं असल्याचं पिंपरी चिंचवडकरांनी सांगितलंय.

नागरिकांनी कायदे पाळायला हवेत आणि तो कायदा अमलात आणण्याआधी त्याची जाणीव करून देण्याची जबादारी कायद्याच्या रक्षणकर्त्यांची असते. त्यामुळे पोलीस आयुक्तांचा कायद्याचा जालीम उपाय सर्वसामन्यांसाठी बडगा ठरू नये एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे.

 VIDEO : 'दगडूशेठ'चा श्रीगणेशा; तृतीयपंथीयांना मिळाला आरतीचा मान

First published: September 16, 2018, 7:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading