पुण्यातला 'हा' योगायोग म्हणजे राजकीय भूकंपाची शंका, फडणवीस-पवारांच्या पुन्हा रगंल्या चर्चा

पुण्यातला 'हा' योगायोग म्हणजे राजकीय भूकंपाची शंका, फडणवीस-पवारांच्या पुन्हा रगंल्या चर्चा

पुण्यात एकीकडे पवार कुटुंबीय पार्थ पवारच्या मुद्यावरुन खलबतं करणार आहेत. तर नेमके त्याच वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही पुण्यात आहेत.

  • Share this:

पुणे, 14 ऑगस्ट : राज्यात कोरोनाचं संकट असताना राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. एकीकडे पवार कुटुंबातील वादंग तर दुसरीकडे भाजपकडून वारंवार होणारी टीका. या सगळ्यात पुण्यात एक राजकीय योगायोग पाहायला मिळाला आहे. पुण्यात एकीकडे पवार कुटुंबीय पार्थ पवारच्या मुद्यावरुन खलबतं करणार आहेत. तर नेमके त्याच वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही पुण्यात आहेत.

फडणवीस एका कोविड सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने 15 ऑगस्टलाच पुण्यात असणार आहेत. नेमकं राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या कंटुंबात पार्थ पवारच्याबद्दल एकत्रित चर्चा होत असताना देवेंद्र फडणवीसही तिथेच असल्याने फडणवीस-पवार यांच्यातील राजकीय समीकरणाविषयी पुन्हा चर्चा व्हायला लागल्या आहेत. पार्थ पवारला शरद पवार यांनी अपरिपक्व म्हटल्यानंतर फडणवीस यांनी हा त्यांच्या परिवारातला विषय आहे असं म्हणत सावध भूमिका घेतली होती.

पवार कुटुंबात All is Not Well...! रोहितनं दिली पहिली प्रतिक्रिया

मात्र, पार्थ यांच्या राममंदिर आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात भाजपला अनुकूल भूमिका घेतल्याने पवार-फडणवीस यांच्यातील समीकरण अप्रत्यक्षपणे कायम असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. त्यामुळे ज्या दिवशी पवार कुटुंबीयांची पार्थबद्दलची चर्चा होणार तेव्हाच नेमके फडणवीस पुण्यात कसे याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.

पवार कुटुंबाची उद्या महत्त्वाची बैठक, कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी शेवटचा प्रयत्न

अगदी आजच्या सामनाच्या आग्रलेखातही पार्थच्या निमित्ताने कोणी दुसरंच राजकारण करतंय का अशी शंकाही व्यक्त करण्यात आली आहे. हे सरकार अंतर्विरोधानं कोसळेलं असं फडणवीस अनेक वेळा म्हणाले आहेत. आता तर या सरकारचा रिमोट कंट्रोल असलेल्या पवार कुटुंबात असलेला अंतर्विरोध चव्हाट्यावर आला आहे. याकडे भाजपचं बारीक लक्ष नसेल तरच नवल.

पुणेकरांसाठी अजित पवारांचा मोठा निर्णय, कोरोनाला हरवण्यासाठी देणार मोठा निधी

गेल्या वर्षी 23 नोव्हेंबरला सगळ्यांना मोठा राजकीय धक्का देत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडला होता. त्यानंतर एकेकाळी एकमेकांवर प्रखर टीका करणारे हे दोन नेते कोणाच्याही नकळत राजकीय मित्र झाल्याचं सगळ्यांनाच दिसलं होतं. आता मैत्री पुन्हा एकदा फुलुन राज्यात काही राजकीय भूकंप होणार का याची चर्चा सुरु झाली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 14, 2020, 10:45 PM IST

ताज्या बातम्या