Home /News /news /

एखाद्या पुरुषाही लाजवेल या महिलेने केलेलं काम, पुण्यात कोरोना मृतांसाठी मोलाचा उपक्रम

एखाद्या पुरुषाही लाजवेल या महिलेने केलेलं काम, पुण्यात कोरोना मृतांसाठी मोलाचा उपक्रम

प्रत्येक धर्मचा अंत्यसंस्कार हा त्यांच्या विधीप्रमाणे झाला पाहिजे असं प्रत्येकला वाटतं. मात्र, कोरोना मृतदेह असल्याने तो विधी करता येत नाही.

पुणे, 17 ऑगस्ट : कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढते मृत्यू पुण्यात होत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झाला तर कोणी मृतदेह ही ताब्यात घेत नाहीत. कोरोना मृतदेहावर अनेकदा विधीवत अंत्यसंस्कार होत नाहीत म्हणून नातेवाईक हवालदिल असतात. प्रत्येक धर्मचा अंत्यसंस्कार हा त्यांच्या विधीप्रमाणे झाला पाहिजे असं प्रत्येकला वाटतं. मात्र, कोरोना मृतदेह असल्याने तो विधी करता येत नाही. पण पुण्यातील ख्रिश्चन धर्मात कोरोना मृत्यू झाला तर दफनविधीसाठी खड्डा खोदण्या पासून ते माती टाकेपर्यंत काम करून धर्माप्रमाणे प्रार्थना करत अंत्यसंस्कार करण्याचं काम एक महिला करत आहे. पुरोगामी पुण्यात सावित्रीबाई फुलेंचा वारसाच सगाई नायर चालवत आहेत. शरद पवारांच्या निवासस्थामागे कोरोनाचा कहर, एकाच वेळी तब्बल 9 जणांना कोरोना सगाई नायर यांनी कोविड 19 च्या प्रादुर्भावाने मृत्यू झालेल्या 30 व्यक्तींच्या ख्रिश्चन धर्माप्रमाणे अंत्यविधी केल्या आहेत. गेली चार महिने त्या स्वतः अंबुलन्समधून मृतदेह घेऊन दफनभूमीपर्यंत घेऊन जातात. ख्रिश्चन धर्मानुसार प्रार्थना वाचन करून स्वतः आपल्या हाताने मृतदेह खड्ड्यात पुरतात. खड्डा खणण्यापासून ते तो भरण्यापर्यंत सगळी काम त्या स्वत: करतात व नंतर खड्डे बुजविण्याचे काम करीत आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचं निधन हे सर्व सॅलिस्बरी पार्क मीशनरी दफनभूमीत गेले 4 महिने त्यांचा हा नित्यक्रम सुरू आहे. सर्व मदत करणाऱ्याना करतात महिलांनी पुढे याव असं नायर सांगतात. त्यांना मदत करण्यासाठी मुस्लिम मुलं निवासी मंच सहकार्य करत आहेत. सगई नायर या गरज पडली तर दुसऱ्या समाजातील निराधार व्यक्तींवर ही अंत्यविधी करतात. त्यांच्या या कामामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतूक होतं आहे. एखाद्या पुरुषालाही लाजवेल असं काम सगई नायर करत आहेत. त्यांच्या या कामाला न्यूज 18 लोकमतचाही सलाम!
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Pune, Pune news

पुढील बातम्या