Pune News: पुणेकरांवरचं संकट टळलं! जिल्हाधिकाऱ्यांनी दिली दिलासादायक बातमी

Pune Remdesivir Injection Update: पुण्याला अखेर 3.5 हजार रेमडिसीव्हीर इंजेक्शन मिळालेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी थेट दिल्लीतून ही 3500 इंजेक्शन मागवून घेतली आहेत.

Pune Remdesivir Injection Update: पुण्याला अखेर 3.5 हजार रेमडिसीव्हीर इंजेक्शन मिळालेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी थेट दिल्लीतून ही 3500 इंजेक्शन मागवून घेतली आहेत.

  • Share this:
पुणे, 15 एप्रिल: राज्यातील इतर शहरांप्रमाणेच पुण्यातील रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या (Remdesivir Injection ) तुटवड्याची समस्या ऐरणीवर आली होती. मात्र आता काही काळासाठी पुण्यातील ही समस्या दूर झाल्याचं चिन्ह आहे. पुण्याला अखेर 3.5 हजार रेमडिसीव्हीर इंजेक्शन मिळालेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी थेट दिल्लीतून ही 3500 इंजेक्शन मागवून घेतली आहेत. एक्सपोर्ट स्टॉकमधील रेमडिसिव्हीर इंजेक्शन्स दिल्लीमध्ये शिल्लक होती, ती मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्तिगत संबंध वापरून पुणेकरांना दिलासा दिल्याची माहिती मिळते आहे. इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने या साऱ्या प्रकाराविरोधात कोरोना रुग्णांच्या (Corona Patients) नातेवाईकांनी गुरुवारी सकाळी आक्रमक पवित्रा घेतला होता. रेमडिसिव्हीर मिळत (Remdesivir Injection Shortage in Pune) नाही म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले. कोरोना रुग्णांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झाले होते. राज्यात बुधवारी रात्रीपासून कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू झाली आहे, असे असूनही हे सर्व कोरोना रुग्णांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील मार्गावर एकत्र आले होते, त्यांनी रास्तारोको करण्याचा प्रयत्नही केला. (हे वाचा-कोरोनाचा नवा स्ट्रेन डोळ्यांवर करतोय परिणाम, ऐकण्याची क्षमताही होतेय कमी) कोरोना रुग्णांच्या या नातेवाईकांनी असा आरोप केला होता की, गेले तीन दिवस ससूनमध्ये रेमडिसिव्हीर उपलब्ध नाही आहे. रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याने सामान्यांना हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचा आरोप या नातेवाईकांनी केला होता. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली होती. (हे वाचा-कोरोना रुग्णांना काहीसा दिलासा, औषध कंपन्यांनी Remdesivir चे उत्पादन वाढवले) दरम्यान ज्या रूग्णांच्या नातेवाईकांनी कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन केलं होतं त्यांनाही हॉस्पिटल मार्फत तात्काळ इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसंच पुण्यात आजतरी कुठेही ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र भविष्यातील ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन नियोजन हाती घेतल्याचं पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितलं आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published: