पुणे, 12 ऑगस्ट : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने शहरातील आरोग्ययंत्रणेचा बोजवारा उडाला असताना अनेक पुणेकरांना बेड अभावी धावाधाव करावी लागत आहे. यातील काही जणांना प्राणही गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे विभागाने 50 डब्यांत तयार केलेले आयसोलेशन वॉर्डमधील 450 बेड चार महिन्यांपासून धूळ खात पडून असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
रेल्वेने तयार केलेल्या बेडचा वापर पुण्यातील रुग्णांना तर झाला नाहीच. याशिवाय रेल्वेने केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. राज्य व केंद्र सरकारच्या प्रशासनातील समन्वयाच्या अभावी सामान्य करदात्या नागरिकांना याची किंमत मोजावी लागत आहे. याचा सगळा फटका सर्वसामान्य पुणेकरांना भोगावा लागत आहे. अशात कोरोना रुग्णांकडून भले मोठं बिल आकरलं जात असल्याचं समोर आलं आहे.
WhatsAppची मैत्री पोहोचली MMS, बलात्कारापर्यंत; पीडितेने सांगितली धक्कादायक घटना
राज्यात कोरोनाच्या कहराबरोबरच रुग्णालयांकडून आकारले जाणारे अव्वाच्यासव्वा बिलं ही नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. कोरोनाच्या उपचाराचा खर्च पाहूनच लोकांमध्ये कोरोनाविषयीची भीती अधिक बळावत आहे. यातच पुणे पालिकेने मोठा निर्णय घेतला.
पुण्यात यापुढे दीड लाखांच्यावर आकारणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयाचे कोरोना बिलांचे ऑडिट करण्यात येणार आहे. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना ही माहिती दिली. इतकचं नव्हे तर अवाजवी बिलांप्रकरणी पुणे मनपाकडून 25 रुग्णालयांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णवाढी पेक्षा डिस्चार्जचे प्रमाण जास्त, ही समाधानाची बाब असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
वडील झोपेत घोरत होते म्हणून आला राग, मुलाने बापालाच पाठवलं मृत्यूच्या दारात
पुण्यात यापुढे दीड लाखांच्यावर सर्व कोरोना बिलांचे ऑडिट केलं जाणार आहे. कोरोना उपचारांच्या नावाखाली अनेक खासगी रुग्णालयांकडून रूग्णांची लूट सुरू होती. याबाबत तक्रारी देखील पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पुणे मनपा यासंबंधी 25 रुग्णालयांना नोटीसाही धाडल्या आहेत. याबाबत पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी न्यूज18 लोकमतला याबाबत माहिती दिली.