मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Pune News : भाजप नगरसेविका अर्चना बारणेंचं निधन, डेंग्यूची झाली होती लागण

Pune News : भाजप नगरसेविका अर्चना बारणेंचं निधन, डेंग्यूची झाली होती लागण

नगरसेविका अर्चना बारणे यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे

नगरसेविका अर्चना बारणे यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे

नगरसेविका अर्चना बारणे यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे

पिंपरी, 13 जुलै :  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (pimpri chinchwad municipal corporation) भाजपच्या नगरसेविका अर्चना तानाजी बारणे (BJP corporator Archana Barne ) यांचं आज मंगळवारी निधन झालं. अर्चना बारणे यांना डेंग्यूची लागण झाली होती. एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान सायंकाळी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

अर्चना बारणे यांची काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराअंती त्यांना डेंगूची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, उपचारादरम्यान, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. आज संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. थेरगाव येथील स्मशानभूमीत रात्री 8 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुमचं वय 40 च्या आत आहे? या सुंदर शहरात स्थायिक होण्यासाठी मिळत आहेत 25 लाख!

अर्चना बारणे यांनी पहिल्यांदाच महानगर पालिकेची निवडणूक लढवली होती भाजपच्या चिन्हावर जिंकून आल्या होत्या. प्रभाग क्रमांक 23, शिवतीर्थनगर, समर्थनगर, केशवनगरमधून भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या. त्यांनी स्थायी समितीचे सदस्यत्व आणि 'ग' प्रभाग कार्यालयाचे अध्यक्षपदही भुषविले.

सहा महिन्यांपूर्वी टेस्ट टीमचा कॅप्टन, आता लष्करामध्ये दाखल झाला क्रिकेटपटू

दरम्यान, नगरसेविका अर्चना बारणे यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढतायत मात्र महापालिका प्रशासनाकडे एकूण रुग्ण संख्या किती याची माहितीच नसल्याने पुन्हा एकदा  ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

First published: