पुणे, 19 ऑगस्ट : पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येणं हे काही नवीन नाही. पण यंदा महापालिकेने नवा गोंधळ घातला आहे. महापालिकेकडून निवृत्त झालेल्या शिक्षकांना तब्बल तीन महिने वेतन गेल्याचा प्रकार स्थायी समितीच्या बैठकीत समोर आला आहे. या सगळ्या प्रकरणात सत्ताधारी भाजपच लक्ष नसल्याने हे प्रकार घडत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक महेंद्र पठारे यांनी केला आहे.
या सगळ्यावर स्थायी समितीचे अध्यक्ष यांनी ही प्रशासनाची चूक असल्याचं सांगत या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहितीही दिली आहे. शिक्षकांना दिलेल्या ज्यादा वेतनाच्या रकमा परत वसूल केल्या जात असल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. खरंतर, पुण्यात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे.
Good News: घर घेणं होणार आणखी स्वस्त, राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
कोरोनाच्या संकटामुळे आधीच आर्थिक संकट आहे. अशात पालिकेने केलेल्या या कारभारामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान, पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पण नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार, गेल्या 10 दिवसात शहरातील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ही तब्बल 8 टक्क्यांनी घटली आहे. तसंच पेशंट्स दुपट्टीचा कालावधीदेखील 30 दिवसांवरून 41 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे.
पतीने पूर्ण केली मृत पत्नीची इच्छा, निधनानंतर 7 जणांमध्ये राहणार जिवंत
या दिलासादायक आकडेवारीवरून पुण्यात कोरोनाचा आलेख फ्लँटन झाल्याचं वाटत असलं तरी पालिका प्रशासन आताच कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाहीत. म्हणूनच पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रूबल आगरवाल यांनी पुणेकरांना गणेशोत्सवाच्या काळात विनाकारण बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.