डॉक्टर लॉबीपुढे पुणे प्रशासनानं टाकली नांगी; आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला कार्यभार!

डॉ. वैशाली जाधव यांचा 'पीएनडीटी'चा कार्यभार काढून घेतलाय. यामुळे न्यायालयात अंतिम टप्प्यात असलेल्या अनेक प्रकरणांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2018 02:36 PM IST

डॉक्टर लॉबीपुढे पुणे प्रशासनानं टाकली नांगी; आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला कार्यभार!

पुणे, 5 नोव्हेंबर : पुणे महापालिकेतील ओरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव याचा कार्यभार कमी करण्यात आलाय. शहरातील बेकायदा गर्भपात केंद्रांविरोधात त्यांनी मोहिमच उघडली होती. परंतू, डॉक्टर लॉबीनं टाकलेल्या दबावापुढं महापालिका प्रशासनानं नांगी टाकत, डॉ. वैशाली जाधव यांचा 'पीएनडीटी'चा कार्यभार काढून घेतलाय. यामुळे न्यायालयात अंतिम टप्प्यात असलेल्या अनेक प्रकरणांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


पुणे महापालिकेतील आरोग्य विभागाच्या धडाडीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. वैशाली जाधव यांच्या कडून पीएनडीटीचा कार्यभार काढून घेण्यात आलाय. शहरातल्या बेकायदा गर्भपात केंद्रांविरोधात डॉ. जाधव यांनी मोठी मोहिमच उघडली होती. डॉ. जाधव यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे बेजकायदेशीरपणे लिंगनिदान करणाऱ्या काही रेडिओलॉजिस्टना तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्यांच्या सोनोग्राफी मशिन्स देखील त्यांनी सील केल्या होत्या.


आर्थिक हितसंबंध दुखावल्याने गैर आणि बेकायदेशीर काम करणाऱ्या काही रेडिओलॉजिस्ट आणि काही स्त्री रोग तज्ज्ञांकडून डॉ. जाधव यांची बदली करावी यासाठी दबाव टाकला जात होता. याच कारणासाठी पुण्यात ima (इंडियन मेडिकल असोसिएशन) ने मोर्चा देखील काढला होता. अखेर महापालिका प्रशासन या दबावापुढे झुकलं. एका कार्यक्षम अधिकाऱ्याचा बळी देण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांतून संताप आणि हळहळ व्यक्त होतेय.


यापूर्वी गर्भपात हक्क कायद्याच्या अंमलमलबजावणीचे अधिकार डॉ. वैशाली जाधव यांच्या कडून काढून घेण्यात आले होते. आता गर्भलिंगनिदान कायदा कारवाईचे अधिकारही काढून घेण्यात आल्याने न्यायालयात अंतिम टप्प्यात असलेल्या अनेक प्रकरणांच्या निकालावर निश्चितच परिणाम होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


 VIDEO : नाशिकमध्ये धक्कादायक अपघात, भल्या मोठ्या ट्रकची थेट टॅक्सीला धडक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 5, 2018 02:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close