आप आये बारिश लाये, असं महापौरांनी म्हणताच मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी छतातून धारा!

आप आये बारिश लाये, असं महापौरांनी म्हणताच मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी छतातून धारा!

कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं उद्धाटनपर भाषण सुरू असतानाच भर कार्यक्रमातच या नव्या कोऱ्या इमारतीचं छत गळायला सुरूवात झाली. त्यामुळे 50 कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या इमारतीच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

  • Share this:

अद्वैत मेहेता, पुणे, ता, 21 जून :पुण्यात आज महापालिकेने मनपाच्या विस्तारीत इमारतीचं मोठ्या थाटात उद्घाटन झालं पण या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं उद्धाटनपर भाषण सुरू असतानाच भर कार्यक्रमातच या नव्या कोऱ्या इमारतीचं छत गळायला सुरूवात झाली. त्यामुळे 50 कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या इमारतीच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

पुणे मनपाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात महापौर मुक्ता टिळक यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं स्वागत करताना मोठ्या उत्साहात, आप आये बारिश लाये, अशा काव्यात्मक पंक्ती म्हटल्या. पण त्यांना काय माहित की, याचा त्यांना लगेच याची देही याची डोळी नजारा बघायला मिळेल ते....

अमेरिकेचा आरोग्यखर्च कमी करण्याची जबाबदारी भारतीय डॉक्टरवर!

प्रवाशांना विमानातून हकलवण्यासाठी एअर एशियाच्या पायलटनं एसी केला जोरात

त्याचं झालं असं झालं की कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच या नव्याकोऱ्या इमारतीचं छत गळायला सुरूवात झाली. सभागृहाच्या एका भागात छतातून चक्क धारा लागल्या. तिथल्या माणसांना उठून दुसरीकडे बसावं लागलं. भाषणात थोडा व्यस्तयही आला.

आता या छत गळतीवर विरोधकांनी टिका केली नाहीतरच नवल.....इमारत अपूर्ण असतानाही पालिकेनं उद्घाटनाच घाट घातल्यानेच ही छत गळतीची नामुष्की ओढवल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. महापौर मुक्ता टिळक यांनी मात्र इमारत अपूर्ण असल्याचे आरोप फेटाळत कचरा साचल्याने पाणी गळती झाल्याची सारवासारव केली.

दुधी भोपळा जीवावर बेतला, रस प्यायल्यामुळे महिलेचा मृत्यू

वीरप्पनचा खात्मा करणारा अधिकारी 'मिशन काश्मीर'साठी नियुक्त !

योगायोग म्हणजे 60 वर्षांपूर्वी तत्कालीन उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनीच पुणे पालिकेचे उदघाटन केले होते तेव्हाही इमारत अर्धवट असल्याची टीका झाली होती आणि आताही नेमकं तेच घडलं, म्हणतात ना,....पुणे तिथे काय उणे हे हेच ब्रीद पुन्हा सार्थ ठरलंय. असंच इथं खेदानं नमूद करावसं वाटतं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2018 07:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading