मुळशीत पोलीस चौकीसमोरच गुंडाची कोयत्याने हत्या !

मुळशीत पोलीस चौकीसमोरच गुंडाची कोयत्याने हत्या !

मुळशी तालुक्यात कोळवण पोलीस चौकशीसमोरच कुख्यात गुंडाची धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आलाय. पप्पू सातपुते असं या मयत गुंडाचं नाव आहे. गुरूवारी रात्री आठच्या सुमाराला अज्ञात हल्लोखोरांनी पप्पू सातपुतेला ठार मारलं.

  • Share this:

पुणे, 15 सप्टेंबर : मुळशी तालुक्यात कोळवण पोलीस चौकशीसमोरच कुख्यात गुंडाची धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आलाय. पप्पू सातपुते असं या मयत गुंडाचं नाव आहे. गुरूवारी रात्री आठच्या सुमाराला अज्ञात हल्लोखोरांनी पप्पू सातपुतेला ठार मारलं. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

सुशांत उर्फ पप्पू लक्ष्मण सातपुते हा त्या परिसरातील कुख्यात गुंड होता. त्याला पप्पू नावाने ओळखत असत. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, हाणमारीचे गुन्हे दाखल होते. काही दिवसांपूर्वी त्याला याप्रकरणी तडीपारही करण्यात आलं होतं.

कोळवण परिसरात काही दिवसांपूर्वीचं पप्पचं काही जणांसोबत भांडण झालं होतं. त्यामुळे त्याला मारण्यात कोळवण परिसरातीलच काही तरुणांचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्यासोबत असलेल्या रवींद्र सातपुते याच्यावरही हल्ला करण्यात आला असून तो जखमी झाला आहे.

या घटनेच्या निमित्ताने मुळशी तालुक्यातलं गँगवॉर पुन्हा चर्चेत आलंय. मुळशी तालुक्यात जमिनी खरेदी विक्रीच्या व्यवहारात गुंडांच्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत. त्यातूनच पप्पू सातपुतेची हत्या झालीय का याचाही पोलीस तपास करताहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2017 04:20 PM IST

ताज्या बातम्या