संजय काकडेंचा रिव्हर्स गियर, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मन बदललं?

संजय काकडे काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय बदलून ते भाजपातच राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र पुणे लोकसभा मतदार संघात काकडेंना भाजपची उमेदवारी देण्यात आलेली नाही अशी माहिती समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 11, 2019 10:36 PM IST

संजय काकडेंचा रिव्हर्स गियर, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मन बदललं?

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी


मुंबई, 11 मार्च : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सहयोगी खासदार असलेले संजय काकडे यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. नाराज संजय काकडे यांनी भाजपसोडून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे काकडेंना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला वर्षा बंगल्यावर गेले होते. यावेळी मुख्यमंत्री आणि काकडेंमध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

संजय काकडे काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय बदलून ते भाजपातच राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र पुणे लोकसभा मतदार संघात काकडेंना भाजपची उमेदवारी देण्यात आलेली नाही अशी माहिती समोर आली आहे. तर काकडेंचा पक्षात सन्मान केला जाईल अशी भूमिका मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आली आहे.

भाजपचे सहयोगी खासदार असलेले संजय काकडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पुण्यातून काकडेंना लोकसभेसाठी भाजपने नकार दिला. त्यामुळे काकडे काँग्रेसकडून यंदा निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती.

Loading...

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली. अशातच भाजपला राज्यात धक्का देत संजय काकडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत असे संकेत त्यांनी दिले होते.

पुण्यातील नेते आणि राज्यसभा खासदार संजय काकडे हे आधी काँग्रेसचे सहयोगी खासदार होते. पण त्यानंतर त्यांनी भाजपला साथ दिली. मात्र ते पुन्हा एकदा स्वगृही येणार असून ते लवकरच काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारणार होते.

'जर काँग्रेसने सन्मानाने तिकीट दिलं तर पुण्यातून लोकसभा लढणार', असं काकडे यांनी म्हटलं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. तसंच भाजपसाठी मी तन- मन-धन दिलं तरी, माझा विचार का होत नाही' अशी खंतही त्यांनी बोलावून दाखवली.

काकडे का झाले भाजपवर नाराज?

न्यूज18 लोकमतशी बोलताना संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून आपण लायक उमेदवार असल्याचं सांगितलं होतं. 'पुणे महापालिका निवडणुकीचे गिरीश बापट हे मुळीच शिल्पकार नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बापट विरुद्ध काकडे हा सामना खरंच व्हावा यासाठी मी उत्सुक आहे', असंही काकडे म्हणाले होते.

'भाजप पक्षासाठी तन-मन-धन दिलं, तरी माझा विचार का होत नाही याचं दुःख आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझा सन्मान राखतील', अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

संजय काकडे यांनी उघड नाराजी दाखवूनही भाजपकडून लोकसभेचं तिकीटाचं आश्वासन मिळालं नाही. यातूनच मग काकडेंनी भाजपपासून दूर होण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.


VIDEO : सेनेत दाखल झाल्यानंतर शरद सोनवणे राज ठाकरेंबद्दल म्हणतात...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2019 10:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...