पुणे मॅरेथॉनला अॅथलेटिक्स महासंघाची मान्यताच नाही !

पुणे मॅरेथॉनला अॅथलेटिक्स महासंघाची मान्यताच नाही !

येत्या रविवारी म्हणजेच 3 डिसेंम्बरला होणाऱ्या पुणे आंतर राष्ट्रीय मॅरेथॉनला अॅथलेटिक्स महासंघाची मान्यता नसल्याचं पत्र संघटनेनं दिलंय. आमची या स्पर्धेला मान्यता नसल्याने धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी होऊ नये, असं आवाहनही अॅथलेटिक्स महासंघानं केल्यानं मोठी खळबळ उडालीय.

  • Share this:

1 नोव्हेंबर, पुणे : येत्या रविवारी म्हणजेच 3 डिसेंम्बरला होणाऱ्या पुणे आंतर राष्ट्रीय मॅरेथॉनला अॅथलेटिक्स महासंघाची मान्यता नसल्याचं पत्र संघटनेनं दिलंय. आमची या स्पर्धेला मान्यता नसल्याने धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी होऊ नये, असं आवाहनही अॅथलेटिक्स महासंघानं केल्यानं मोठी खळबळ उडालीय. दरम्यान, असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन संघटनेची आम्हाला मान्यता असल्याने अॅथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेचा प्रश्नच उदभवत नाही, अशी भूमिका स्पर्धा संयोजकांनी घेतलीय.

1983 साली सुरेश कलमाडी यांनी पुढाकार घेऊन देशात सर्वात प्रथम पुण्यात आंतर राष्ट्रीय मॅरेथॉन सुरू केली. 2 वर्षांचा अपवाद वगळता गेली 32 वर्षे ही स्पर्धा अखंडपणे सुरू आहे. कलमाडी यांनी स्वतःचं राजकीय स्थान देखील याच स्पर्धेच्या माध्यमातून बळकट केलं होतं. पण राष्टकुल घोटाळ्यात कलमाडींना आरोपी केलं गेल्याने ते राजकारणातून बाजूला फेकले गेले. त्यामुळे मग स्पर्धा संयोजकांनी महापालिकेशी जुळवून घेत कलमाडींच्या अनुपस्थितीतही ही स्पर्धा सुरूच ठेवलीय.

गेली काही वर्षे तर पुणे महापालिकाच या स्पर्धेची मुख्य प्रायोजक आहे. प्रल्हाद सावंत हे स्पर्धेचे संचालक आहेत. पण यावेळी पुणे मनपात भाजपची सत्ता असल्याने प्रल्हाद सावंत यांनी महापौर मुक्ता टिळक यांनाही संयोजक समितीत स्थान दिलंय. नेमकी हीच बाब कलमाडींना खटकल्याने स्पर्धेच्या आयोजनावरून वाद सुरू झालेत. या वादातूनच पुणे मॅरेथॉनच्या मान्यतेचा वाद उफाळून आल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2017 01:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading