'हा' निर्णय हुकूमशाहीकडे जाणार, मनसेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

'हा' निर्णय हुकूमशाहीकडे जाणार, मनसेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मनसेचे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून सरकारसुद्धा चांगल्या अधिकाऱ्यांचा राजकीय बळी घेणार का? असा सवाल केला आहे.

  • Share this:

पुणे, 19 एप्रिल : महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा बसला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. पुण्यातही रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच ससून रुग्णालयामुळे मृतांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ससूनमधून अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले  यांची बदली करण्यात आली आहे. याबद्दल मनसेनं तीव्र आक्षेप घेतला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे.

लोकमत डॉट.कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, ससून रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू प्रकरणामुळे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बदली करण्याच्या निर्णयावर पुण्याचे मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे तीव्र आक्षेप घेत राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. अजय शिंदे यांनी फेसबुक लाईव्ह करून राज्य सरकारचा हा निर्णय तुघलकी निर्णय असल्याची टीका केली आहे.

मनसेचे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून सरकारसुद्धा चांगल्या अधिकाऱ्यांचा राजकीय बळी घेणार का? असा सवाल केला आहे.  डॉ. अजय चंदनवाले यांच्या बदलीमागे राजकीय डाव असून त्यामुळे त्यांचा बळी गेला आहे. ससूनमध्ये गेल्या काही दिवसांपासून  चांगले बदल होत आहे. चंदनवाले आणि त्यांच्या टीमचे काम चांगले आहे. पण राजकीय हस्तक्षेपामुळे याला खोडा पडला आहे. ससूनमधील प्रशासनाला अधिकाधिक महत्त्व दिलं जात आहे.  त्यामुळे  चंदनवाले यांनी कशा प्रकारे चुकीचे काम केले असं सांगितलं गेलं, आणि राज्य सरकारनेही तातडीने निर्णय घेतला. हे योग्य नाही, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -गनिमी कावा करत 'ते' तुंबाडला पोहोचले, लेकरांना पाहून वर्दीतला माणूसही हादरला!

तसंच, चंदनवाले यांच्या बदलीच्या विरोधात आम्ही भांडत नाही. परंतु, राज्य सरकार ज्या पद्धतीने निर्णय घेत आहे. कुणा एका राजकीय पक्षाला हवा तसा निर्णय घेता यावा, जेणे करून आम्ही हव्या त्या माणसाला हटवू शकतो, असा संदेश दिला जातो. हा निर्णय हुकूमशाहीकडे जाणार असून तुघलकी आहे, असंही शिंदे म्हणाले.

दरम्यान, अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी गुरूवारी राज्य सरकारने तडकाफडकी बदली केली. त्याच्या निषेधात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून सरकारच्या निर्णयाचा निषेध केली.

संपादन - सचिन साळवे

First published: April 19, 2020, 11:58 AM IST
Tags:

ताज्या बातम्या