News18 Lokmat

पुण्यात आयटीत काम करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

मुंढवा येथील आयटी कपनीत काम करणा-या 22 वर्षीय तरुणाने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीय. अश्विनी गवारे (वय-22, रा. शिरूर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Jan 29, 2018 07:23 PM IST

पुण्यात आयटीत काम करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

29 जानेवारी, पुणे : मुंढवा येथील आयटी कपनीत काम करणा-या 22 वर्षीय तरुणाने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीय. अश्विनी गवारे (वय-22, रा. शिरूर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत अश्विनी ही मुंढव्यातील ग्लोबल टॅलेंट ट्रॅक या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीस होती. मागील काही दिवसांपासून ती रजेवर होती. आज सकाळी ती कामावर हजर झाल्यानंतर काही वेळात त्याच इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेली आणि खाली उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, तीने आत्महत्या का केली ?, याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

दरम्यान, घरगुती वादातून तिने आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. मुंढवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करताहेत. मागील आठवड्यातही एका आयटी अभियंत्याने कुटुंबासह आत्महत्या केली होती. त्यापाठोपाठ आयटी क्षेत्रातील ही दुसरी आत्महत्येची घटना उघडकीस आल्याने या क्षेत्रातील ताणतणावाचा प्रश्न नव्याने ऐरणीवर आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2018 07:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...