पुण्यात कर्जाला कंटाळून व्यापाऱ्याची कुटुंबासह आत्महत्या !

पुण्यात कर्जाला कंटाळून व्यापाऱ्याची कुटुंबासह आत्महत्या !

पुण्यातील शिवणे भागात एका व्यापाऱ्याने कर्जाला कंटाळून आपलं अख्खं कुटुंबं संपवून स्वतःही आत्महत्या केलीय.

  • Share this:

17 फेब्रुवारी, पुणे : पुण्यातील शिवणे भागात एका व्यापाऱ्याने कर्जाला कंटाळून आपलं अख्खं कुटुंबं संपवून स्वतःही आत्महत्या केलीय. शुक्रवारी रात्री पोकळेनगर भागात ही घटना उघडकीस आलीय. निलेश सुरेश चौधरी (वय 38), नीलम निलेश चौधरी (वय 33), श्रेया निलेश चौधरी (वय 7), श्रावणी निलेश चौधरी (वय 9 ) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश यांच्यावर डोक्यावर मोठे कर्ज झाले होते, ते फेडणे शक्य नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असावे. निलेश यांनी आधी तिघांची हत्या केली मग स्वतःलाही गळफास घेऊन आत्महत्या केली.

निलेश चौधरी यांच्या खिशात चिठ्ठी मिळाली असून, त्यात कर्जामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्यात म्हटले आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आले असून उत्तम नगर पोलीस तपास करीत आहे. निलेश चौधरी यांच्या दोन्ही मुली पुण्यातच शिक्षण घेत होत्या. या दोन्ही मुली शाळेत खूप हुशार होत्या. त्यांचा नेहमी पहिला, दुसरा क्रमांक असायचा. त्यामुळे या घटनेनंतर शिवणे परिसरात हळहळ व्यक्त होतेय.

First published: February 17, 2018, 1:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading