VIDEO : एक्स्प्रेस वेवर कारचा विचित्र अपघात,सुरक्षा पट्टी कारच्या आरपार

VIDEO : एक्स्प्रेस वेवर कारचा विचित्र अपघात,सुरक्षा पट्टी कारच्या आरपार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एका कारला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारही रस्त्याच्या सुरक्षा पट्टीत कार आरपार घुसली.

  • Share this:

पुणे 03 जुलै : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एका कारला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारही रस्त्याच्या सुरक्षा पट्टीत कार आरपार घुसली.

पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील सोमटणे फाटया जवळ हुंदाई एसयुव्ही कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला.  या अपघातात अमोल पाटील, श्रीमंत भोंदे  प्रकाश वाईगडे हे थोडक्यात बचावले. हे सर्व जण मीरा भाईंदर येथील रहिवासी आहे.

या कारचा ताबा सुटल्यानंतर कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षण पट्टीला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, सुरक्षा पट्टी कारच्या आरपार गेली. या धडकेमुळे कारच्या पुढच्या बाजूचा चेंदामेंदा झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. तिन्ही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

First published: July 3, 2018, 7:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading