घटनाक्रम : डीएसकेंच्या स्वप्नांना नेमकी कशी लागली 'घरघर' ?

घटनाक्रम : डीएसकेंच्या स्वप्नांना नेमकी कशी लागली 'घरघर' ?

खरंतर डीएसके हा पुणे बांधकाम व्यावसायातील एक विश्वसनीय ब्रँड पण, त्यांनी हडपसरचा ड्रीमसिटी प्रोजेक्ट हाती घेतला आणि तिथूनच खऱ्याअर्थाने डीएसके आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडत गेले. पाहुयात घटनाक्रम...

  • Share this:

17 फेब्रुवारी, पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यायसायिक डीएसके अर्थात दीपक सखाराम कुलकर्णी यांना आज अखेर गुंतवणूदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिल्लीतून अटक केलीय. त्यांच्या पत्नी हेमांगी कुलकर्णी यांना देखील पोलिसांनी दिल्लीतूनच अटक केली असून या दोघांनाही आज संध्याकाळ पर्यंत पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. डीएसकेच्या विरोधात हजारांच्या गुंतवणूकदारांनी 230 कोटींची फसवणूक केल्याचा गंभीर आहे. पण मुळात पुणेकरांना स्वप्नातलं घर देणाऱ्या 'डीएसके विश्व'च्या बांधकाम व्यवसायाला हडपसरच्या ड्रीम सिटी प्रोजेक्टपासूनच घरघर लागल्याचं स्पष्ट होतंय. पाहुयात डीएसके आर्थिक फसवणूक घोटाळ्याचा घटनाक्रम...

घटनाक्रम : डीएसकेंच्या 'स्वप्न'ला 'घरघर' :-

11 जून 2017 कंपनीची आर्थिक परिस्थिती सांगणारा डीएसकेंचा पहिला विडिओ पुण्यामधे व्हायरल

07 जुलै 2017 पुण्यामधे ठेवीदारांची पहिली बैठक

04 ऑगस्ट 2017 ठेवीदारांच्या मेळाव्यात डीएसकेंचं ठेवीदारांना महिनाभरात ठेवी परत करणार असल्याचं आश्वासन

महिनाभरांनंतरही पैसे परत परत करू शकले नाहीत

सप्टें-ऑक्टो 2017 माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एका लेखमालिकेत डीएसकेंच्या फसवणुकीची माहिती लिहिली..

28 ऑक्टो. 2017 डीएसकेंविरोधात पहिली एफआयआर आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल

30 ऑक्टो. 2017 कोल्हापूरातही डीएसकेंविरोधात दोन गुन्हे दाखल

5 नोव्हें. 2017 पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

9 नोव्हें.2017 पुणे सत्र न्यायालयानं अर्ज फेटाळला..

10 नोव्हें. 2017 डीएसकेंची मुंबई हायकोर्टात याचिका

23 नोव्हें. 2017 हायकोर्टाचे तपास अधिकाऱ्यांना सर्व भागधारकांच्या देय रक्कमेच्या मोजमापाचे आदेश

30 नोव्हें. 2017 एकूण रकमेच्या 25 टक्के रक्कम भरण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे डीएशकेंना आदेश

पुढील सुनावणीला तसं हमीपत्र देण्याचेही आदेश

5 डिसें 2017 डीएसकेंनी 15 दिवसांत हायकोर्टात 50 कोटी रूपये भरण्याचं हमीपत्र लिहून दिलं..गरज पडल्यास संपत्तीही विकेन असं सांगितलं.

21 डिसें2017 सुप्रीम कोर्टानं पैसे भरण्यासाठी 4 आठवड्यांचा वेळ दिला

18 जाने. 2018 सुप्रीम कोर्टाची मुदत संपत आल्यानं डीएसकेंची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव

22 जाने. 2018 50 कोटींची तजवीज झाल्याची डीएसकेंची कोर्टात माहिती..3 दिवसांत पैसे कोर्टात जमा करण्याचा दावा

25 जाने. 2018 पैसे जमा करू न शकल्यानं हायकोर्टाची डीएसकेंना समज

5 फेब्रु. 2018 कोर्टानं डीएसकेंना कडक शब्दांत सुनावलं..काहीही करा आणि कोर्टात पैसे जमा करा.

10 फेब्रु. 2018 पुणे सत्र न्यायालयानं डीएसकेंचा मुलगा शिरिष कुलकर्णींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

13 फेब्रु. 2018 मुंबई हायकोर्टात डीएसकेंच्या मुलगा शिरिष कुलकर्णींचा अटकपूर्व जामिन अर्ज..पत्नी हेमांतीसह डीएसके कोर्टात हजर

14 फेब्रु.- बुलडाणा अर्बन बँक मदत करणार असल्याचा डीएसकेंचा दावा

15 फेब्रु.- मदत नाही कर्ज देणार असल्याचा बुलडाणा अर्बन बँकेनं केलं स्पष्ट

संपत्ती आधीच गहाण असल्यानं डीएसकेंचा बनाव उघड

16 फेब्रु.- हायकोर्टात पुन्हा सुनावणी, डीएसकेंचं अंतरिम संरक्षण काढून घेतलं

17 फेब्रु.- दिल्लीत डीएसके आणि त्यांच्या पत्नीला अटक, पुणे कोर्टात हजर करणार

First published: February 17, 2018, 1:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading