Home /News /news /

पुण्यात माणुसकीचं दर्शन, टेरेसवर अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्लाचा असा वाचवला जीव

पुण्यात माणुसकीचं दर्शन, टेरेसवर अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्लाचा असा वाचवला जीव

मुक्या जीवांना संकटात मदतीचा हात देण्याचं धाडस आणि त्यांना जीवदान देण्यात तरुणांना यश आलं आहे.

पिंपरी-चिंचवड, 02 मार्च : मुक्या जीवांना संकटात मदतीचा हात देण्याचं धाडस आणि त्यांना जीवदान देण्यात तरुणांना यश आलं आहे. पुण्यात पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन पाहायला मिळालं. रिवर रेसिडेंसी नावाच्या रहिवासी इमारतीवर अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. सोसायटीमधील तरुणांनी या कुत्र्याच्या पिल्लाला सुखरुप रेस्क्यू केलं आहे. या पिल्लाच्या रेस्क्यूचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रहिवासी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर बाहेरच्या बाजूनं कुत्र्याचं पिल्लू अडकून बसलं होतं. ते तिथपर्यंत गेलं कसं हा सवालही उपस्थित होतं आहे. मात्र तिथे अडकलेल्या कुत्र्याच्या या पिल्लाला सुखरुप खाली उतरवण्यासाठी तरुणानं सोसायटीमधील आपल्या मित्रांना मदतीला घेतलं. कुत्राचं पिल्लू रविवारी रात्री उशिरा पाचव्या मजल्यावरील कडेला बसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तरुणांनी सकाळी या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी काठी आणि दोरी घेतली. एका तरुणानं खाली उतरुन या तरुणाच्या पायात काठीच्या सहाय्यानं दोरीचा लूप करून अडकवला आणि पाट बांधून त्याला अडकलेल्या ठिकाणहून वर काढलं. भीतीमुळे हे पिल्लू बिथरल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या पिल्लाच्या रेस्क्यू ऑपरशन केल्यानंतर या तरुणांच्या टीमचं सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव झाला.
Published by:Kranti Kanetkar
First published:

पुढील बातम्या