Home /News /news /

पुण्यात डॉक्टराने परिचारिकांना केली शिवीगाळ, संभाजी ब्रिगेडने केली कारवाईची मागणी

पुण्यात डॉक्टराने परिचारिकांना केली शिवीगाळ, संभाजी ब्रिगेडने केली कारवाईची मागणी

ही योजना ऐच्छिक असून त्यात नाव नोंदविण्याची कुठलीही सक्ती नसणार आहे. ज्यांना इच्छा असेल त्या सगळ्यांना नाव नोंदविता येणार आहे.

ही योजना ऐच्छिक असून त्यात नाव नोंदविण्याची कुठलीही सक्ती नसणार आहे. ज्यांना इच्छा असेल त्या सगळ्यांना नाव नोंदविता येणार आहे.

पुण्यात डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी एक घटना समोर आली. या डॉक्टराने आपल्याचं हाताखाली काम करणाऱ्या महिला परिचारिकांना शिवीगाळ केली.

पुणे, 07 मे : कोरोना व्हायरसने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. कोरोनाच्या थैमानापुढे अनेक देशांनी हात टेकले आहे. पण, अशा या परिस्थितीत जीवाची बाजी लावून डॉक्टर आपलं कर्तृव्य बजावत आहे. परंतु, पुण्यात डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी एक घटना समोर आली.  या डॉक्टराने आपल्याचं हाताखाली काम करणाऱ्या महिला परिचारिकांना शिवीगाळ केली. पुण्यातील गणेश पेठ परिसरातील  खाजगी हॉस्पिटल चालवणारे डॉ. महेश बोरा यांचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संभाजी ब्रिगेडने या या प्रकरणी डॉ, बोरावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. हेही वाचा - हाच का तुमचा 'सायन पॅटर्न'? भाजप नेत्यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा 'डॉ. महेश बोरा यांचे खाजगी  'बोरा हॉस्पिटल' गणेश पेठ, पुणे येथे आहे. हे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या  परिचारिकांना अर्वाच्च भाषेत शिव्या देतात. त्यांच्या आई-वडिलांना शिव्या देत आहेत. हॉस्पिटलमध्ये स्टाफला कुठल्याही प्रकारचे 'सेफ्टी किट' देत नाहीत आणि उलट त्यांना त्यांच्या राहत्या घरातून  बाहेर काढण्याची भाषा करतात. महाराष्ट्र सरकारने स्पष्ट आदेश काढलेला आहे की, भाडेकरूंना तीन महिने घराबाहेर काढू नये किंवा भाडेसाठी तगादा लावू नये. त्यामुळे या डॉक्टरावर पुणे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे नेते संतोष शिंदे यांनी पत्रकातून केली आहे. हेही वाचा - कोरोना योद्ध्यांवर 10 तरुणांनी धारदार हत्यारानं केला हल्ला, नर्स गंभीर जखमी तसंच, या प्रकरणी डॉ. महेश बोरा यांना फोन केला होता. परंतु, त्यांनी फोन बंद ठेवला आहे. लाॕकडाउन असल्यामुळे बाहेर पडता येत नसलं तरी, आम्ही या डॉक्टरच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत. या डॉक्टरांनी तात्काळ त्या नर्सची माफी मागावी, अशी मागणीही ब्रिगेडने केली.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Pune

पुढील बातम्या