कोरोनाचं थैमान; पुणेकरांची चिंता मिटली, हॉटेलमधून होम डिलिव्हरी होणार सुरू

कोरोनाचं थैमान; पुणेकरांची चिंता मिटली, हॉटेलमधून होम डिलिव्हरी होणार सुरू

हॉटेलमध्ये किचन सुरू ठेवायला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.

  • Share this:

पुणे, 20 मार्च : एकीकडे पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण पुण्यात हॉटेल आणि रेस्तराँ यांना बंदी असताना पार्सल सुविधा सुरू राहणार आहे. त्याकरता हॉटेलमध्ये किचन सुरू ठेवायला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना जेवण बाहेरून मागवता येणार आहे.

दुसरीकडे, पुणे जिल्ह्यात आता वाईन शॉप आणि बीअरशॉपही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेस्टॉरंट आणि परमिट रूम 2 दिवसांपूर्वी बंद झाले आहेत. अशातच आता पुणे जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत मद्यविक्रीला पूर्ण ब्रेक लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यात एकाला कोरोनाची लक्षणं न दिसताही रिपोर्ट आला पॉझिटिव्ह!

पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाली असून ही संख्या आता 21 वर पोहोचली आहे. पुण्यात स्कॉटलँडवरून एक संशयित पॉझिटिव्ह निघाला आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये फिलीपाईन्स रिटर्नची टेस्ट पॉझिटिव्ह निघाली आहे.

फिलीपाईन्सवरून आलेले दोन्हीही भाऊ कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यातील एकामध्ये कोरोनाची लक्षणं नसूनही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुण्यात असे कितीजण कोरोना वाहक बनून फिरत आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 52 वर पोहोचला आहे. आज मुंबई आणि पुण्यात आणखी 3 रुग्ण आढळून आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

First published: March 20, 2020, 1:45 PM IST

ताज्या बातम्या