बाईक्सचंं शहर असलेलं पुणे गाड्या चोरण्यातही 'अव्वल'

बाईक्सचंं शहर असलेलं पुणे गाड्या चोरण्यातही 'अव्वल'

या सर्वांवर जबर बसवण्यासाठी एक पोलीस अधिकारी हडपसर पोलीस ठाण्यात काम करत आहे

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे २१ सप्टेंबर- देशातलं सर्वाधिक दुचाकींच शहर म्हणून पुण्याची ओळख आहे.  त्यापाठोपाठ आणखी एक ओळख आहे ती म्हणजे दुचाकी चोरी होणाऱ्या शहरांमध्येही पुणे अग्रणी आहे. पुण्यातून रोज चार ते पाच दुचाकी चोरीला जातात. याबद्दल पोलीस स्थानकात तक्रारही दाखल होतात. पण आता या सर्वांवर जबर बसवण्यासाठी एक पोलीस अधिकारी हडपसर पोलीस ठाण्यात काम करत आहे. त्यांनी केवळ ९ महिन्यांमध्ये ३५० दुचाकींचा शोध लावला असून ४५ आरोपींना अटक केली आहे.

हडपसर पोलीस ठाण्याच्या आवारात दुचाकींचा अक्षरश खच पडलेला दिसेल. आत गाड्या ठेवायला जागा नसल्याने वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या ठेवल्या आहेत. या सगळया गाड्या चोरीच्या असून त्यांचा शोध लावत संबंधित गुन्हेगारांना अटक केली आहे. ही कामगिरी केली आहे हडपसर पोलीस ठाण्यातील पीएसआय मंगेश भांगे आणि त्यांच्या पथकाची. भांगे यांच्या पथकाने अनोख्या पद्धतीने चोरलेल्या दुचाकींचा शोध लावला. त्यामुळे आतापर्यंत ४०० गाड्या चोरून पोलिसांच्या हाती न लागणारा आरोपी प्रकाश गायकवाडला पथकाने अटक केली आहे.

चोरीच्या दुचाकींचा नंबर बदलून त्या ग्रामीण भागात विक्रीसाठी नेण्यात येतात. त्यामुळे चोरी केलेल्या गाड्यांचे बदललेले नंबर हा त्यांच्या तपासाचा मुख्य भाग होता. चोरांनी बदलून टाकलेल्या नंबरमध्ये दुचाकीच्या नंबरच्या सीरिज आणि चारचाकी किंवा इतर मोठ्या गाड्यांच्या सीरिज यात अनेकदा चुका असतात आणि त्यावरून गाडी चोरीची आहे की नाही ते लक्षात येतं. एकदा ही माहिती मिळाली की सुरू होतो आरोपींचा माग. यासाठीही जबरदस्त मेहनत घ्यावी लागते. वाहन चोरीचा महारथी अशी ओळख असलेल्या प्रकाश गायकवाडला अटक करण्यासाठी तब्बल दोन दिवस आणि रात्री भांगे यांचे पथक एकाच जागी स्तब्ध बसून होत.

VIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न

First published: September 21, 2018, 4:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading