बबनराव पाचपुते भीषण कार अपघातातून थोडक्यात बचावले

बबनराव पाचपुते भीषण कार अपघातातून थोडक्यात बचावले

  • Share this:

पुणे, 29 जून : माजी मंत्री बबनराव पाचपुते भीषण अपघातातून थोडक्यात बचावले. त्यांच्या गाडीला शिरुरजवळ भीषण अपघात झालाय.

पाचपुते यांच्या गाडीला रात्री 10.30 च्या सुमारास शिरुरजवळ कानीफनाथ फाटा परीसरातील हाॅटेल सदगुरू वडेवाले इथं भीषण अपघात झाला. पाचपुते यांची  कार मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला धडकली.

पाचपुतेंची कारही ट्रकला मागील बाजूस जोरदार आदळली यात कारच्या समोरील बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचुर झालाय.

परंतु, नशीब बलवत्तर म्हणून बबनराव पाचपुते यांना कुठलीही ईजा झाली नाही. बातमी कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन तर अनेकांनी मोबाईलवरुन पाचपुतेंची विचारपुस करत धीर दिला.

First published: June 30, 2018, 12:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading