पुणे, 03 ऑगस्ट : पुण्यात गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. आताही एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुरखा घालणाऱ्या एका डॉक्टर महिलेवर एका अमेरिकी महिलेने हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका 43 वर्षीय अमेरिकी महिलेने बुरखा घातलेल्या डॉक्टरवर हल्ला केला आहे. या संपूर्ण प्रकरणाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमेरिकी महिलेचं मानसिक संतुलन ठिक नसल्यामुळे हा प्रकार घडला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अमेरिकन महिलेची मानसिक स्थिती नाही ठीक
एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, अमेरिकी महिला मानसिकरित्या आजारी आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर, पीडित व्यक्ती व्यवसायाने डॉक्टर आहे. पीडित महिलेने अमेरिकन महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिला पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील क्लोव्हर सेंटर मार्केटमध्ये खरेदी करत असताना ही घटना घडली.
बुरखा घातलेल्या अमेरिकन महिलेने 27 वर्षीय महिलेला विचारलं 'तू मुस्लिम आहे का?'
पोलिसांनी सांगितलं की, भांडण सुरू झालं तेव्हा एका अमेरिकन महिलेने बुरखा घातलेल्या महिलेला विचारले की, तू मुस्लिम आहे का? छावनी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित मुलीने हो असं उत्तर दिल्यावर अमेरिकन महिलेने तिच्यावर अत्याचार केला आणि तिला मारहाण करण्यास सुरवात केली.
SPECIAL REPORT: अब्दुल सत्तारांमुळे शिवसेनेचं बळ वाढणार?