S M L

पुण्यात मुस्लिम अनाथ आश्रमातून बिहारच्या 36 मुलांची सुटका, बाल तस्करीचा संशय

News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2018 12:00 AM IST

पुण्यात मुस्लिम अनाथ आश्रमातून बिहारच्या 36 मुलांची सुटका, बाल तस्करीचा संशय

पुणे, 27 जुलै : पुण्यातील कोंढवा भागात एका मुस्लिम अनाथ आश्रमात धक्कादायक बाबसमोर आली आहे. पुणे पोलिसांनी कारवाई करू 36 अल्पवयीन मुलांची सुटका केली आहे. यातील बहुंताश मुलंही बिहार येथील आहे. त्यामुळे या प्रकरणामागे बाल तस्करीचा संशय बळावला आहे.  कोंढवा भागातील जमाइतुल खैरिया अल इस्लामीया या मुस्लिम मुलांच्या अनाथ आश्रमावर पोलिसांनी कारवाई करून 36 मुलांची सुटका केली. या आश्रमातून 2 भावंडं पळून गेली होती  त्यांनी लैंगिक शोषणाची तक्रार केली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणी अब्दुल रहीम या मौलानाला अटक करण्यात आलीय.

कोंढव्यात अत्यंत चिंचोळ्या गल्लीत आणि टेकडीसदृश भागातील जमाइतुल खैरिया अल इस्लामीया एज्युकेशन आणि चॅरीटेबल ट्रस्ट या मुस्लिम अनाथ आश्रमातून काही दिवसांपूर्वी 2 मुलं पळून गेली होती. ती मुलं साथी संस्थेच्या कार्यकर्त्याना रेल्वे स्टेशनवर सापडली. ही मुलं पुणे रेल्वे स्टेशनवर साथी या संस्थेला भेदरलेल्या स्थितीत ही मुले मिळाली त्यांनी लैंगिक अत्याचाराची कहाणी कथन केली. चाईल्ड वेलफेअर कमिटी अर्थात cwc समोर या मुलांचे जवाब नोंदवण्यात आले. त्या मुलांनी या अनाथ आश्रमातील एका शिक्षकाने लैंगिक शोषण केल्याचं सांगितलं. त्यानंतर या साथी संस्थेनं पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी अनाथ आश्रमावर छापा मारला. मुस्लिम अनाथ गृहात पोलीस पोहचले तेव्हा गोडावून सारख्या या आश्रमातून पोलिसांनी 36 मुलांना कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये आणलं. कोंढवा पोलिसांनी या अनाथ आश्रमात जाऊन 36 मुलांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आलंय. या प्रकरणी एका मौलवीला अटक केली आहे.


राज ठाकरेंनी बोलू नये आणि राणेंचीही मध्यस्थी नको,मराठा कार्यकर्त्यांनी बजावले

आणखी काही मुले पळून गेली आहेत तसंच इतरही मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय आहे. तसंच हा अनाथ  आश्रम असला तरी यातील अनेक मुलांना पालक आहेत. मात्र या प्रकरणाची व्याप्ती वाढू शकते. कारण यातली बहुतांश मुलेही बिहार मधील आहेत आणि अनाथ नाही. त्यामुळे बाल तस्करीचं हे मोठं प्रकरण असल्याचं दिसतंय.

एवढया मोठ्या प्रमाणात मी मुलांची सुटका करण्याचे अलीकडच्या काळातील हे पहिलं उदाहरण असावं. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

Loading...

आजपासून 'या' वस्तू स्वस्त, खरेदी करताना किंमत नक्की पहा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2018 10:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close