Home /News /news /

एका रात्रीचे एक लाख, पुण्यात MBA करणाऱ्या 2 अभिनेत्रींना सेक्स रॅकेटमध्ये पकडलं

एका रात्रीचे एक लाख, पुण्यात MBA करणाऱ्या 2 अभिनेत्रींना सेक्स रॅकेटमध्ये पकडलं

पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला तेव्हा तेथून दोन परदेशी आणि एका मुंबई महिलेसह तीन महिलांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या 2 एजंटांनाही अटक केली आहे.

    मुंबई, 22 जानेवारी : मुंबईत पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकला आणि मोठ्या सेक्स रॅकेटचा उलगडा झाला आहे. या सेक्स रॅकेटमध्ये सिनेमांमध्ये काम करणार्‍या काही अभिनेत्रीही सहभागी असल्याचं सांगण्यात येत आहे. सेक्स रॅकेटच्या या धंद्यात पोलिसांनी अटक केलेल्या तिन्ही महिलांपैकी दोन मुळच्या तुर्कमेनिस्तानची असून मुंबईत वास्तव्य करताना सिनेमांत लहान भूमिका करायची. खरंतर, मुंबई पोलिसांना बातमी मिळाली होती की, शहरातील इम्पीरियल हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचं जाळं पसरलं आहे. ज्यात परदेशी मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला तेव्हा तेथून दोन परदेशी आणि एका मुंबई महिलेसह तीन महिलांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या 2 एजंटांनाही अटक केली आहे. सिनेमात काम करण्याव्यतिरिक्त या दोन्ही महिला पुण्यातील महाविद्यालयातून एमबीए देखील करत होत्या. पोलिसांनी जावेद आणि नावेद या एजंटांनाही अटक केली आणि ते त्यांच्यासाठी ग्राहक आणत असत. पोलिसांनी पकडलेल्या परदेशी महिलांच्या वक्तव्याच्या आधारे त्यांनी सांगितले की, त्यांना एका रात्री सिनेमाचे काम करण्याचे आमिष दाखवून या धंद्यात आणलं. लाखो रुपये कमवल्यानंतर आम्हाला वेश्या व्यवसायाची सवय लावली होती. इतर बातम्या - मोठा घोटाळा! वाडिया रुग्णालयाने पालिका-रुग्णांकडून उकळले पैसे, हा घ्या पुरावा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना खूश करण्यासाठी हा तरुणींना एका रात्रीसाठी एक लाख रुपये दिले जायचे. सोमवारी रात्री या तरुणींना थ्री स्टार हॉटेलमध्ये बोलवण्यात आलं होतं. याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर  समाजसेवा शाखेनं सापळा रचला आणि रंगेहाथ जावेद आणि नावेदसह या 3 तरुणींना ताब्यात घेतलं. इतर बातम्या - पवारांनी गुगली टाकून राजकारण बदलले, तुम्ही सामना बदला, शिंदेंचा खेळाडूंना सल्ला याआधीही म्हणजे 4 दिवसांपूर्वी  मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने मागील आठवड्यात एक हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आणलं होतं. पोलिसांनी मुंबईतील अंधेरी पूर्व येथील ड्रॅगन फ्लाय या थ्री स्टार हॉटेलवर धाड टाकून तीन मुलींची सुटका केली. यामध्ये एक हिंदी अभिनेत्री, एक मराठी अभिनेत्री आणि एक अल्पवयीन मुलगी यांची सुटका करण्यात आली. इतर बातम्या - मुंबईच्या तरुणाची साताऱ्यामध्ये हत्या, पुरावे मिटवण्यासाठी केलं धक्कादायक कृत्य
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या