Elec-widget

‘ते मर्यादा ओलांडत आहेत...’ शबाना आझमी- जावेद अख्तरवर भडकला पाकिस्तान

‘ते मर्यादा ओलांडत आहेत...’ शबाना आझमी- जावेद अख्तरवर भडकला पाकिस्तान

शबाना आझमी आणि जावेद अख्तर हे कराचीमध्ये शबाना यांचे वडील आणि कवी कैफी आझमी यांच्या शताब्दी उत्सवात सहभागी होणार होते.

  • Share this:

जम्मू- काश्मीमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा देशात संतापाची भावना उसळून लवकरात लवकर सूड घेण्यात येण्याची मागणी जनतेकडून केली जात होती. बॉलिवूडनेही या हल्ल्याची निंदा केली. शबाना आझमी आणि त्यांचे पती गीतकार- लेखक जावेद अख्तर यांनी कराचीचा दौरा रद्द केला.

शबाना आझमी आणि जावेद अख्तर हे कराचीमध्ये शबाना यांचे वडील आणि कवी कैफी आझमी यांच्या शताब्दी उत्सवात सहभागी होणार होते. मात्र या हल्ल्याचा निषेध म्हणून दोघींनीही पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेतला. दौरा रद्द केल्यानंतर आर्ट्स काऊंसिल ऑफ पाकिस्तानने दोघांना खडे बोल सुनावले.रवीवारी द डॉन या वृत्तपत्राने काऊंसिलचे अध्यक्ष अहमद शाह यांच्यावतीने लिहिले की, ‘शबाना यांनी ज्यापद्धतीने पाकिस्तानवर हल्ला केला, त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. सभ्य व्यक्ती असं कधीच वागणार नाही. भारत पाकिस्तानमधील संबंध सुधारू शकतात ही आशाच त्या बहूधा गमावून बसल्या.मी त्यांच्यावर टीका करत नाही. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर ज्यापद्धतीने त्यांनी निराशा दाखवली ते पाहून मला फाक दुःख झालं. यावेळी शबाना आझमी फार निराश दिसत आहेत.’ काऊंसिल २३- २४ फेब्रुवारीला कैफी आझमी यांची जन्मशताब्दी साजरी करणार आहेत. यात पाकिस्तान आणि जगभरातील अनेक प्रसिद्ध कवी आणि साहित्यिकांना आमंत्रण देण्यात आलं होतं.

Loading...श्रीनगर राजमार्गावर सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. दुसऱ्या दिवशी शबाना आणि जावेद या दोघांनीही पाकिस्तान दौरा रद्द केल्याचं घोषीत केलं. शबाना यांनी लिहिले की, ‘लोकांमध्ये योग्य संभाषण झालं की सरकारला कामकाजाला योग्य दिशा मिळते यावरचा माझा विश्वास पहिल्यांदा हलताना जाणवत आहे. आम्हाला आता सांस्कृतिक देवाण- घेवाण थांबववी लागेल.’आतापर्यंत शबाना आणि जावेद या दोघांनीही नेहमीच पाकिस्तानच्या कलाकारांना आणि पाकिस्तानला पाठिंबा दिला होता.जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी पाकिस्तानातले नियोजित कार्यक्रम रद्द करत पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय घेतला. पण, त्यानंतर देखील कंगनानं जावेद अख्तर आणि शबाना आझमींवर टीका केली होती. याच लोकांनी पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम देण्याचं समर्थन केलं होतं. शिवाय, 'भारत तेरे तुकडे होंगे' असं म्हणणाऱ्या लोकांना यांनीच पाठिंबा दिला होता. पण, आता आपली कृत्य लपवण्यासाठी अशा प्रकारचं काम केलं जात असल्याचं म्हणत कंगनानं जावेद अख्तर आणि शबाना आझमींवर टीका केली.दरम्यान, आता आपल्याला कलाकारांच्या बंदीवर नाही तर, पाकिस्तानला धडा शिकवण्यावर केंद्रीत केला पाहिजे असं देखील कंगनानं म्हटलं होतं. पुलवामा हल्ल्यानंतर कंगनानं मणिकर्णिका चित्रपटाची सक्सेस पार्टी रद्द केली. यावेळी तिनं पाकिस्तान आपल्या केवळ सुरक्षा व्यवस्थेशी खेळत नसून त्यांनी आम्हाला आव्हान दिलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची वेळ आल्याचं देखील कंगनानं म्हटलं होतं.

Pulwama Encounter: भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना घेरले, ग्राऊंडवरून पहिला VIDEO


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 12:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...