Pulwama Attack- सलमानचा मोठा निर्णय, सिनेमातून पाकिस्तानी गायकाला दाखवला बाहेरचा रस्ता

विशेष म्हणजे पुलवामा हल्ल्यानंतर सलमानच्या आधी अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाकिस्तानसोबत असलेले व्यवहार तोडून टाकले.

  • Share this:

अनेकदा संधी देऊनही पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाई कमी होत नाहीत. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात भारतीय जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला.

या हल्याचा राग अजूनही नागरिकांमध्ये आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येकजण आपल्या पद्धतीने या हल्ल्याचा निषेध करत आहेत.

एफडब्ल्यूआयसीई आणि एआयसीडब्ल्यूए या सिनेसृष्टीच्या संघटनांनी यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यात सलमान खानच्या नावाचाही समावेश आहे.

मीडियामधील चर्चेनुसार, सलमान खाननेही या हल्ल्याचा निषेध केला असून आपल्यापरीने त्याने जवानांना श्रद्धाजली वाहिली आहे.

सलमानची निर्मिती असलेल्या ‘नोटबुक’ सिनेमात आतिफ असलम पुढच्या महिन्यात एक गाणं गाणार होता. मात्र आता सलमानने आतिफकडून गाणं गाऊन घेण्यास नकार दिला आहे. आतिफऐवजी आता सलमानच्या नोटबुक सिनेमात अरमान मलिक गाणं गाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सलमानची निर्मिती असलेल्या ‘नोटबुक’ सिनेमात आतिफ असलम पुढच्या महिन्यात एक गाणं गाणार होता. मात्र आता सलमानने आतिफकडून गाणं गाऊन घेण्यास नकार दिला आहे. आतिफऐवजी आता सलमानच्या नोटबुक सिनेमात अरमान मलिक गाणं गाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

विशेष म्हणजे पुलवामा हल्ल्यानंतर सलमानच्या आधी अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाकिस्तानसोबत असलेले व्यवहार तोडून टाकले.

विशेष म्हणजे पुलवामा हल्ल्यानंतर सलमानच्या आधी अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाकिस्तानसोबत असलेले व्यवहार तोडून टाकले.

अभिनेत्री शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी या दरम्यानचा पाकिस्तान दौरा रद्द केला. तर अजय देवगणने टोटल धमाल हा त्याचा आगामी सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित होणार नसल्याचं स्पष्ट केलं.

अजयने ट्विट करत म्हटले की, ‘पुलवामा हल्ल्यानंतर देशातलं वातावरण पाहता टोटल धमाल हा सिनेमा पाकिस्तानाच प्रदर्शित न करण्याचा निर्णय संपूर्ण टीमने घेतला आहे.’ अजयच्या या निर्णयाचं सगळ्या क्षेत्रातून कौतुक केलं जात आहे.

सलमान खान त्याच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या नोटबुक सिनेमात जहीर इकबाल आणि प्रनूतन या नवीन जोडीला लॉन्च करणार आहे. पुढच्या महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.नितीन कक्कर दिग्दर्शित या सिनेमाचं अधिकतर चित्रीकरण काश्मीरमध्येच झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2019 09:55 AM IST

ताज्या बातम्या