Elec-widget

Pulwama दहशतवादी हल्ल्यात नवा खुलासा, 'या' गाडीने घेतले 37 जवानांचे प्राण

Pulwama दहशतवादी हल्ल्यात नवा खुलासा, 'या' गाडीने घेतले 37 जवानांचे प्राण

हल्ला झाल्या त्या घटनास्थळी Maruti Eecoचे साधर्मय असणारे अवशेष सापडले आहेत. त्यावरून हा अंदाज लावण्यात येत आहे.

  • Share this:

पुलवामा, 15 फेब्रुवारी : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी स्फोटात हल्लेखोरांनी वापरली कार Maruti Eeco असल्याची प्राथमिक माहित समोर आली आहे. गुरुवारी जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये आयईडी बॉम्ब पेरून सीआरपीएफ जवानांचा ताफा उडवण्यात आला होता. यासाठी दहशतवाद्यांनी Maruti Eeco कारचा वापर केला असल्याचं तपासात उघड झालं आहे.

हल्ला झाल्या त्या घटनास्थळी Maruti Eecoचे साधर्मय असणारे अवशेष सापडले आहेत. त्यावरून हा अंदाज लावण्यात येत आहे. सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी IED द्वारे आत्मघातकी हल्ला केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं स्थानिक मदतीशिवाय शहरात आणणं दहशतवाद्यांना शक्य नाही असा खळबळजनक खुलासा सीआरपीएफच्या अहवाला मांडण्यात आला आहे.

'गेल्या 15 दिवसांमध्ये 3 वेळा सीआरपीएफचा ताफा हलवला' असल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. ज्यापद्धतीने हा हल्ला झाला त्याप्रमाणे या सगळ्याला स्थानिकांची मदत आहे. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच दहशतवाद्यांकडून अशा प्रकारे 'वाहनांवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे' असे महत्त्वाचे मुद्दे या अहवालात मांडण्यात आले आहे.

सीआरपीएफने हल्ल्याचे संपूर्ण तपशील अहवालात नमूद करत हा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने लगेचच पाऊलं उचलावी असंही या अहवालात लिहण्यात आलं आहे.

दरम्यान, आता या अहवालावर आता केंद्रीय पातळीवर बैठका होतील आणि त्यानंतर यावर कारवाई करण्यात येईल. पण या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट होते की, स्थानिकांच्या मदतीने हल्ले घडवण्यात येत आहेत.

Loading...

तर एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांची ने-आण करण्यासाठी काश्मीरमध्ये परवाणगी नाही आहे. गाड्यांची अदला-बदल, स्फोटकांचा एवढा साठा यासाठी स्थानिक पातळीवर परवाना लागतो. तो कसा देण्यात आला असाही संशय आता व्यक्त करण्यात येत आहे.

या सगळ्या बाबी आता लक्षात घेत. स्थानिक आणि शहरामध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरूवारी पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 37 जवान शहिद झाले. त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली असून लोक रस्त्यावर उतरले आहे. देशातील अनेक भागत पाकिस्तानचा जाहीर निषेध करण्यात येत असून दहशतवाद्यांचा खात्मा करा अशी मागणी देखील केली जात आहे. दरम्यान, जम्मूमध्ये देखील लोक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी त्यांनी भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. पण, जम्मूतील काही भागामध्ये आता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे.

न भूलेंगे, न माफ करेंगे; पुलवामा हल्ल्यानंतर CRPF ची पहिली प्रतिक्रिया

'हा हल्ला ना कधी विसरणार, ना माफ करणार' अशी प्रतिक्रिया CRPFकडून देण्यात आली आहे. या सगळ्यात मोठ्या आत्मघातकी हल्ल्यानंतर संपूर्ण देश 'बदला घ्या' अशा पाकिस्तान विरोधातल्या घोषणा देत रस्त्यावर उतरला. त्यावर आता केंद्रीय राखीव पोलीस दलाकडूनदेखील कठोर शब्दात हल्लेखोरांना इशारा देण्यात आला आहे.

'पुलवामा हल्ल्य़ामध्ये शहीद झालेल्या जवानांना आम्ही वंदन करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. या भ्याड हल्ल्याचा आम्ही बदला घेणार' अशी प्रतिक्रिया CRPF जवानांकडून देण्यात आली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे असा कठोर इशार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. गुरुवारी काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. ते झाशीमध्ये आयोजित सभेत बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. दहशतवादीविरोधातल्या कारवाईला आता वेग मिळणार आहे. हा हल्ला केलेल्या गुन्हेगारांना माफ करणार नाही. त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा नक्की मिळणारच. पाकिस्तान उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी लष्कराला सगळ्या प्रकारच्या कारवाईकरता पूर्ण सूट दिली आहे. सैन्याच्या ताकदीवर देशाला पूर्ण विश्वास आहे. आणि देश त्यांच्या पाठीशी आहे' अशा शब्दात पंतप्रधानांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.

हेही वाचा: पुलवामा हल्ल्यानंतर लोकांमध्ये उद्रेक, जम्मूतील काही भागांमध्ये कर्फ्यू

ते पुढे म्हणाले की, 'पाकिस्तानला आता धडा शिकवावाच लागणार आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जी देशाची प्रतिक्रिया आहे तिच माझीही प्रतिक्रिया आहे. ही वेळ आता राजकीय -आरोप प्रत्यारोपांची नाही. तर पाकिस्तानला आपली ताकद दाखवण्याची आहे' असं मोदी म्हणाले आहे.

'तुम्ही खूप मोठी चूक केली आहे,' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी संघटनांना इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.

दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ला

पुलवामा येथील अवंतीपोरा येथील गोरीपोरा सीआरपीएफच्या ताफ्यावर IEDद्वारे हल्ला केला. हल्लाजैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.या घटनेनंतर पुलवामा येथे असलेल्या सर्व जवानांना, राज्य पोलीस दल आणि सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना अवंतिपोरा येथे पाठवण्यात आले आहे.

या घटनेनंतर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. तसेच परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. राज्यातील पुलवामा, शोपियां, कुलग्राम आणि श्रीनगर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. काश्मीरमधील हा गेल्या तीस वर्षांतला सर्वात मोठा मानला जात आहे.

संबंधित बातम्या

pulwama terror attack : भाजप सरकारने केली होती सुटका, आता तोच दहशतवादी बनला डोकेदुखी

‘ज़िंदा रहने के मौसम बहुत हैं मगर, जान देने की रुत रोज़ आती नहीं...’ महाराष्ट्रातील शहीद सुपुत्राची कहाणी

Pulwama Terror Attack- घरातील कमावता एकुलता एक मुलगा शहीद


VIDEO : नितीन राठोड यांच्या जाण्यानं 'हे' गाव बुडालं शोकसागरात; नाही पेटली चूल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2019 06:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...