EDची नोटीशीमुळे पवारांना मिळणार 'पोलिटिकल गेन', ग्रामीण महाराष्ट्रातून पाठिंबा वाढला!

EDची नोटीशीमुळे पवारांना मिळणार 'पोलिटिकल गेन', ग्रामीण महाराष्ट्रातून पाठिंबा वाढला!

शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर झालेल्या गुन्ह्याचा राष्ट्रवादीकडून जाहीर निषेध करत आज मंठा, आष्टी शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.

  • Share this:

जालना, 26 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप केला होता. तर दुसरीकडे ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर केंद्रीय दक्षता आयोगानेही बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यासह तत्कालीन संचालकांची चौकशी करण्याचे आदेश नाबार्डला दिल्याची माहिती आहे. त्यामुळे पवारांच्या अडचणी आणखी वाढल्या. पण असं असताना पवारांना याचा फायदा होत असल्याचं दिसत आहे.

शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर झालेल्या गुन्ह्याचा राष्ट्रवादीकडून जाहीर निषेध करत आज मंठा, आष्टी शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. 25 सप्टेंबरला  बारामतीतही बंद पाळण्यात आला होता. विविध सामाजिक संघटनांनी या बंदचं आवाहन केलं होतं. तर सरकारच्या हुकूमशाहीचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचं या संघटनांनी म्हटलं होतं. त्यामुळे जरी ईडी कारवाई होणार असली तरी यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातून पवारांचा पाठिंबा वाढत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत याचा राष्ट्रवादीला मोठा फायदा होऊ शकतो.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याच्या निषेदार्थ आज जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शरद पवार समर्थकांच्या वतीने मंठा, आष्टी बंदचं जाहीर आव्हान करण्यात आलं आहे. आज सकाळपासूनच मंठा आणि आष्टी शहरात कार्यकर्त्यांनी फिरून शहरातील दुकानं बंद केली. कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणा देत शहरातील फिरून व्यापाऱ्यांना या बंद मध्ये सहभागी होण्याची विनंती केली. व्यापारी वर्गानेही आपली दुकानं बंद करून सहभाग नोंदवून शंभर टक्के बंद पाळला आहे.

इतर बातम्या - स्वबळावर विधानसभा लढण्याच्या तयारीत, शिवसेनेच्या 'या' मंत्र्याने केलं जाहीर!

'कारवाई होणार असेल तर स्वागत करतो'

ईडीच्या कारवाईनंतर शरद पवार यांनी भाजप सरकारला टोला लगावत सर्व आरोप फेटाळत आहेत. 'मी कधीही कोणत्या सहकारी बँकेचा संचालक नव्हतो. असं असताना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या कारवाईचं मी स्वागतच करतो. मी महाराष्ट्रभर करत असलेल्या दौऱ्याला जो प्रतिसाद मिळत आहे, त्यानंतर अशी कारवाई होणं अपेक्षितच होतं,' असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

इतर बातम्या - धक्कादायक! जुगारात पत्नीची पैज लावत हारला पती, मित्रांना घरी बोलावलं आणि...!

महाराष्ट्रभरात राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका

शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हे दाखल केल्यानंतर शरद पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राष्ट्रवादीने सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. शरद पवार यांच्या फोटोसह 'आय सपोर्ट शरद पवार' असा मजकूर राष्ट्रवादीकडून व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राष्ट्रवादी रान पेटवण्याची चिन्ह आहेत.

हेल्मेट घालून आलेल्या तरुणानं झाडल्या एकामागोमाग गोळ्या, हत्येचा CCTV VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 11:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading