मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'विनर-विनर चिकन डिनर' PUBG बॅन झाल्यानं तरुणांनी काढली अंत्ययात्रा, VIDEO VIRAL

'विनर-विनर चिकन डिनर' PUBG बॅन झाल्यानं तरुणांनी काढली अंत्ययात्रा, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पब्जी प्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पब्जी प्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पब्जी प्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 08 सप्टेंबर : लडाख-चीनच्या सीमेवरील तणावानंतर अनेक मेड इन चायना अॅपवर बंदी घालण्यात आली. लडाखमध्ये धडा शिकवण्यासाठी चीन सरकारने लोकप्रिय गेमिंग अॅप PUNGसह चिनी कंपन्यांशी संबंधित इतर 224 मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. भारतात PUBG गेम सर्वाधिक लोकप्रिय आणि खेळला जात होता. हा ऑनलाइन खेळ बंद झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध स्तरातून राग व्यक्त केला जात आहे. याआधी एका लहान मुलाच्या रडण्याचा व्हिडीओ समोर आला होता.

यामुलाच्या व्हिडीओनंतर आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे. PUBG खेळ बंद झाल्यानंतर त्याची काही तरुणांनी मिळून अंत्ययात्रा काढली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की पबजीचे फॅन असलेले तरुण अंत्ययात्रा काढली आहे.

हे वाचा-भारतात पुन्हा PUBG करणार कमबॅक, कंपनीने घेतला मोठा निर्णय

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पब्जी प्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. पब्जी चाहते एकाच ठिकाणी जमले आहेत. या सगळ्यांनी पब्जीच्या पोस्टरला हार घातला आणि त्याची अंत्ययात्रा काढली. अंत्ययात्रेदरम्यान पब्जीप्रेमी 'विजेता-विजेता चिकन डिनर' म्हणत आहेत. या व्हिडीओमध्ये सगळे जण पब्जीच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना दिसत आहेत.

First published:

Tags: PUBG, Pubg game