'भारतीय माध्यमांनी 'व्हिलन' बनवलं', इम्रान खानच्या पहिल्याच पत्रकार परिषदेतल्या 10 महत्वाच्या गोष्टी

'भारतीय माध्यमांनी 'व्हिलन' बनवलं', इम्रान खानच्या पहिल्याच पत्रकार परिषदेतल्या 10 महत्वाच्या गोष्टी

भारताशी संबंध सुधारायचे आहेत आणि त्यातच दोन्ही देशांचं हित आहे. दोन्ही देशांनी मिळून काश्मीर प्रश्न सोडवला पाहिजे.

  • Share this:

इस्लामाबाद,ता.26 जुलै : पाकिस्तानचे नियोजित पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरूवारी पहिल्यांदाज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केलं. भारतात सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या लोकांमध्ये माझा समावेश होत असूनही तिथल्या माध्यमांनी मला व्हिलन बनवलं अशी टीका त्यांनी केली. पाकिस्तानला भारताशी सबंध सुधारायचे असून त्यातच दोनही देशांचे हित आहे असं त्यांनी सांगितलं आणि नया पाकिस्तानचा नाराही दिला.

या आहेत 10 महत्वाच्या गोष्टी

भारताशी संबंध सुधारायचे आहेत आणि त्यातच दोन्ही देशांचं हित आहे. हे संबध सुधारण्यासाठी दोन्ही देशांमधला व्यापार वाढला पाहिजे. काश्मीर प्रशनावरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी भारताशी चर्चेस तयार आहे.

दोन्ही देशांच्या संबंधात सुधारणा होण्यासाठी काश्मीर हा मुख्य अडसर आहे. काश्मीरात मानवाधिकाराचं उल्लंघन केलं जातं.

भारतीय माध्यमांनी माझी प्रतिमा व्हिलन अशी बनवली आहे. मी भारतात सर्वाधिक ओळखला जात असून मी बॉलीवूडचा कुणी खलनायक आहे असं चित्र रंगवलं गेलं.

मला नवा पाकिस्तान घडवायचा आहे. गरीबी आणि भूकमुक्त असलेला तो पाकिस्तान असेल. कायदे आझम मोहम्मंद जीनांच्या स्वप्नांतला पाकिस्तान घडवायचा आहे.

पाकिस्तानची ढासळणारी अर्थव्यस्था सावरण्याला माझं पहिलं प्राधान्य असेल. विदेशात राहणाऱ्या देशवासियांना मी मदतीचं आवाहन करणार आहे.

भ्रष्टाचारमुक्त सुशासन देण्याचा माझा प्रयत्न असेल. सामान्य नागरिक असो की पंतप्रधान त्या सर्वांना सारखाच न्याय राहिलं.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांसाठी असलेल्या अलिशान निवासस्थानी मी राहणार नाही. एखाद्या साध्या घरात राहायला जाईल.

देशभरात असलेल्या सर्व गव्हर्नर हाऊसेस बंद करून त्याचा चांगल्या कामासाठी उपयोग करण्यात येणार आहे.

चीन आणि अफगाणिस्तानसोबतचे संबध आणखी मजबूत करायचे आहेत. चीनकडून पाकिस्तानला खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. चीनमध्ये एक तज्ञांची टीम पाठवून तिथल्या धोरणांचा अभ्यास करणार आहे.

पाकिस्तानमधल्या निवडणूकीत गोंधळ झाल्याचे आरोप खोटे आहेत. आरोप करणाऱ्यांना सोबत घेऊन चौकशी करण्याची माझी तयार आहे.

 

First published: July 26, 2018, 7:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading