अरुणाचलमध्ये संतप्त नागरिकांनी जाळला उपमुख्यमंत्र्यांचा बंगला

  • Share this:

अरुणाचलची राजधानी इटानगरमध्ये सध्या तणाव झाला आहे. मुळचे अरुणाचलचे नागरिक नसलेल्यांना नागरिकत्वाचा अधिकार देणं आणि काही जमातींचा अनुसूचित जातींमध्ये समावेश करणं याला नागरिकांचा विरोध आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात नागरिक रस्त्यावर आले आणि त्यांनी जोरदार निदर्शने केलीत. लोकांची संख्या वाढल्याने रस्त्यावर तरुणांचे जमाव जमले आणि त्यांनी तोडफोडीला सुरूवात केली.

राजधानी इटानगरमध्ये उपमुख्यमंत्री चौने मेन यांचा बंगला संतप्त तरुणांनी फोडला आणि आवारात नासधूस केली.

इटानगरच्या बाजारपेठेतही काही दुकानांना आगी लावण्यात आल्या. यात दुकानांतं मोठं नुकसान झालं.

इटानगरच्या बाजारपेठेतही काही दुकानांना आगी लावण्यात आल्या. यात दुकानांतं मोठं नुकसान झालं. संतप्त तरुणांनी रस्त्यावर धिंगाणा घालत गाड्यांनाही आगी लावल्या.

अनेक रस्त्यांवर टायर जाळून टाकण्यात आल्याने काही रस्ते बंद बाहतूकीसाठी बंद झाले होते.

इंडो-तिबेटीयन सीमा सुरक्षा दलाच्या जादा तुकड्या मागविण्यात आल्या असून इटानगर आणि काही शहरांमध्ये त्या तैनात करण्यात येणार आहे.

गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे की राज्याच्या मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून सरकारला पाहिजे ती मदत देण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2019 04:55 PM IST

ताज्या बातम्या