मुंबई, 1 जानेवारी : झारखंडमधील समेद शिखरजी या जैन तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यास विरोध वाढत आहे. यावर रविवारी मुंबई, अहमदाबाद आणि दिल्लीत जैन समाजाच्या लोकांनी निदर्शने केली. दिल्लीतील प्रगती मैदान आणि इंडिया गेटवर समाजातील लोक जमले. यासंदर्भात आंदोलकांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिले आहे.
आंदोलकांचे म्हणणे आहे की ते झारखंड सरकारने समेद शिखराला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याच्या विरोधात आहेत. यामुळे जैन समाजाच्या भावना दुखावल्या जाणार आहेत. तीर्थक्षेत्राचे नुकसान होईल. झारखंड सरकारने निर्णय बदलण्याची मागणी आंदोलक करत आहेत. या मुद्द्यावरून 26 डिसेंबरपासून जैन समाजाचे देशभरात आंदोलन सुरू असून, रविवारी ते आणखी तीव्र झाले.
मुंबईत 5 लाख लोकांची निदर्शने
मुंबईतही झारखंड सरकारच्या निर्णयाविरोधात समाज बांधव रस्त्यावर उतरले. महाराष्ट्राचे मंत्री खासदार लोढा म्हणाले की, पालीताना येथील जैन मंदिराच्या तोडफोडीचा आम्ही निषेध करत आहोत आणि झारखंड सरकारच्या श्री समेद शिखरजीचे पर्यटन स्थळात रूपांतर करण्याच्या निर्णयाचा आम्ही निषेध करत आहोत. गुजरात सरकारने अशा लोकांवर कडक कारवाई करावी. लोढा यांच्या म्हणण्यानुसार, आजच्या आंदोलनात सुमारे 5 लाख लोक सहभागी झाले होते.
वाचा - महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात ‘ऑपरेशन लोटस’? भाजपच्या मोठ्या नेत्याचा दावा
गुजरातमधील जैन मंदिराचीही तोडफोड
या निदर्शनांदरम्यान, गुजरातमधील पालिताना शहरातील एका जैन मंदिराचीही तोडफोड करण्यात आली. मुंबई, अहमदाबाद आणि दिल्ली येथील इंडिया गेटवरही जैन समाजाचे लोक याविरोधात निदर्शने करत आहेत.
गुजरातमधील जैन मंदिराचीही तोडफोड
या निदर्शनांदरम्यान, गुजरातमधील पालिताना शहरातील एका जैन मंदिराचीही तोडफोड करण्यात आली. मुंबई, अहमदाबाद आणि दिल्ली येथील इंडिया गेटवरही जैन समाजाचे लोक याविरोधात निदर्शने करत आहेत.
वाचा - राहुल गांधींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, दिल्ली पोलीस म्हणाले..
का होतोय विरोध?
समेद शिखराच्या आजूबाजूच्या परिसरात मांस आणि अल्कोहोलची विक्री आणि खरेदी करण्यास मनाई आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा दारू पिण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर वाद सुरू झाला. पर्यटन स्थळ घोषित झाल्यानंतर जैन धर्म न मानणाऱ्या लोकांची येथे गर्दी वाढली असल्याचे या मंदिराशी संबंधित लोकांचे मत आहे. मांस आणि दारूचे सेवन करणारे लोक येथे येऊ लागल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
2019 मध्ये इको-सेन्सिटिव्ह झोन
2019 मध्ये केंद्र सरकारने समेद शिखरला इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केले. यानंतर झारखंड सरकारने जिल्हा प्रशासनाच्या शिफारशीवरून त्याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याचा ठराव जारी केला.
समेद शिखराचे महत्त्व
झारखंडचा हिमालय मानल्या जाणार्या या ठिकाणी जैनांचे पवित्र तीर्थक्षेत्र शिखरजींची स्थापना केली आहे. या पवित्र परिसरात जैन धर्मातील 24 पैकी 20 तीर्थंकरांना मोक्ष प्राप्त झाला. भगवान पार्श्वनाथ, 23 वे तीर्थंकर यांनी देखील येथे निर्वाण प्राप्त केले. पवित्र पर्वताच्या शिखरावर जाण्यासाठी भाविक पायी किंवा डोलीने जातात. जंगल आणि पर्वतांच्या दुर्गम वाटांमधून ते शिखरावर पोहोचण्यासाठी नऊ किलोमीटरचा प्रवास करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.