मुंबईत घर घेणं महागणार

मुंबईत घर घेणं महागणार

जर मुंबईत एक कोटींचं घर खरेदी केलं तर आता 1 लाख रुपये अतिरिक्त अधिभार मुंबईकरांना भरावा लागू शकतो

  • Share this:

31 मार्च : मुंबईत घर घेणं आता अधिक महाग होणार आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आता घरखरेदीवर एक टक्का अधिभार सुचवण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, जर मुंबईत एक कोटींचं घर खरेदी केलं तर आता 1 लाख रुपये अतिरिक्त अधिभार मुंबईकरांना भरावा लागू शकतो.

तर दुसरीकडे जकात हटवून जीएसटी येणार असल्यामुळे मुंबई पालिकेचं नुकसान कमी करण्याचा पालिकेचा प्रयत्न करणार आहे. आधीच जीएसटीमुळे घरभाड्यावर आणि बांधकाम सुरू असलेल्या घरांच्या हप्त्यांवरही जीएसटी कर द्यावा लागणार आहे. त्यातच आता नवीन घरांसाठी हा अतिरिक्त अधिभार सुचवण्यात आल्यानं  मुंबईत घरखरेदीचं अनेकांचं स्वप्न आता स्वप्नच राहण्याची शक्यता आहे.

First published: March 31, 2017, 4:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading