अंगणवाडी महिलांच्या कामकाजाच्या ग्रुपवर स्वतःचा न्यूड फोटो पाठवणारा अधिकारी अखेर निलंबित

अंगणवाडी महिलांच्या कामकाजाच्या ग्रुपवर स्वतःचा न्यूड फोटो पाठवणारा अधिकारी अखेर निलंबित

महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला त्याचा बेशरमपणा चांगलाच महागात पडला आहे.

  • Share this:

बीड, 24 जुलै: महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला त्याचा बेशरमपणा चांगलाच महागात पडला आहे. महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शासकीय कामकाजाच्या ग्रुपवर स्वतःचा न्यूड फोटो पाठवणारा प्रकल्प अधिकारी जगदीश मोरे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बीड शहरातील घडलेल्या या घृणास्पद प्रकाराबाबत 'न्यूज 18 लोकमत'नं आवाज उठवला होता.

Beed Icds urban नावाच्या महिलांच्या ग्रुपवर अधिकाऱ्यांचा स्वत:चा न्यूड फोटो पोस्ट करून चावटपणा केला आहे. या प्रकारामुळे महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. या पूर्वीही या अधिकाऱ्यानं त्याचे प्रायव्हेट फोटो ग्रुपवर शेअर केल्याची तक्रार महिलांनी केली होती.

हेही वाचा...बकरी ईद! प्रतिकात्मक कुर्बानी इस्लाम विरोधी, काँग्रेस नेत्याचा सरकारला विरोध

महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर स्वत: चा न्यूड फोटो पाठवणारा अधिकारी जगदीश मोरे याचा चावटपणा चौकशीमध्ये उघड झाला आहे. चौकशी समितीच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. जगदीश मोरे या अधिकाऱ्यानं माझा मोबाइल हॅक करून फोटो वायरल करत बदनामी केल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. मात्र, चौकशीअंती यात तथ्य आढळून आलं नसल्याचं हर्षदा देशमुख यांनी सांगितलं आहे.

निलंबनाचे आदेश...

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी या अधिकाऱ्याविरोधात महिलांसोबत असभ्य वर्तन केल्याबाबत तक्रार केली होती. मात्र, त्यावेळी या अधिकाऱ्याला काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठीशी घातलं होतं. आता त्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी केली जाईल, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा... पुण्यात कोरोना साथीशी लढणारा आरोग्य विभागच बाधित, 3 अधिकारी पॉझिटिव्ह

बेशरम जगदीश मोरेवर कठोर कारवाई करा, अशी मागणी अंगणवाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी केली होती. काम करताना सतत त्रास देत असल्याचा महिलांनी आरोप केला आहे. अशा भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पोलिस अधिक्षकांकडे करण्यात आली होती. या अगोदर महिलां कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तवणूक केल्यामुळे या बेशरम अधिकाऱ्यांच्याविरुद्ध भादंवि कलम 353 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता

Published by: Sandip Parolekar
First published: July 24, 2020, 4:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading