PHOTOS : नोटबंदी' करणारे हे अधिकारी करणार आता नोटांवर सही!

News18 Lokmat | Updated On: Dec 12, 2018 06:28 PM IST

PHOTOS : नोटबंदी' करणारे हे अधिकारी करणार आता नोटांवर सही!

'

शक्तिकांत दास यांच्या नावाची मंगळवारी तातडीनं आरबीआयचे नवे प्रमुख म्हणून घोषणा झाली होती. त्यानंतर त्यांनी बुधवारी 12 डिसेंबरला मुंबईतल्या मुख्यालयात आपल्या पदाची सूत्रं घेतली. गुरुवारी देशातल्या बड्या बँकांच्या सीईओ आणि संचालकांची बैठक बोलावून चर्चा करणार करणार असल्याचं ते म्हणाले. (फोटो सौजन्य - पीटीआय)

शक्तिकांत दास यांचा 26 फेब्रुवारी 1957 ला जन्म झाला. त्यांनी इतिहासात एमए केलं असून ते तमिळनाडू कॅडरचे IAS अधिकारी आहेत. केंद्रीय सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांची 15 व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Loading...

केंद्रीय महसूल, अर्थ आणि इतर काही मंत्रालयात त्यांनी सचिवपदाचा कार्यभार उत्तमपणे सांभाळला होता. जी-20 परिषदेत भारताचे शेर्पा म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. आर्थिक विषयांचा त्यांचा उत्तम अभ्यास आहे.

नोटबंदीच्या काळात ते अर्थमंत्रालयात सचिव होते. नोटबंदी राबविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गटाचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. नोटबंदीच्या काळात दररोज पत्रकार परिषद घेऊन ते बदलत्या नियमांची माहिती देत असत. नोटबंदी करणारे हे अधिकारीच आता गव्हर्नर झाल्याने आता त्यांच्याच सहीने नोटा निघणार आहे.

नोटबंदी आणि त्यानंतरची परिस्थिती हाताळणं हे त्यांच्या कारकिर्दीतलं सगळ्यात मोठं आव्हन होतं. त्यांचं ते कौशल्य पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. निवृत्ती नंतर त्यांची वित्त आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

2008 मध्ये पी. चिदंबरम् हे अर्थमंत्री असताना त्यांची पहिल्यांदा अर्थमंत्रालयात नियुक्ती झाली होती. त्यानंतर प्रणव मुखर्जी यांच्यासोबतही त्यांनी काम केलं. त्यामुळेच सुब्रम्हण्यम स्वामी यांचा त्यांच्यावर राग आहे.

नोटबंदी, जीएसटी, नंतरचा आरबीआय आणि सरकारमधला संघर्ष अशा पार्श्वभूमीवर शक्तिकांत दास यांना आरबीआयची स्वायत्ता कायम ठेवत प्रतिष्ठा जपण्याचं मोठं आव्हान पेलावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2018 06:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...