'मॅच मेकिंग' लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून प्राध्यापिकेने सहा जणांना गंडवले

'सेकंड शादी कॉम' या मॅच मेकिंग साईटच्या माध्यमातून एका प्राध्यापिकेने सहा जणांसोबत लग्न करून त्यांना लाखो रुपयांना चुना लावला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2019 04:35 PM IST

'मॅच मेकिंग' लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून प्राध्यापिकेने सहा जणांना गंडवले

प्रवीण मुधोळकर, (प्रतिनिधी)

नागपूर, 1 जूलै- 'सेकंड शादी कॉम' या मॅच मेकिंग साईटच्या माध्यमातून एका प्राध्यापिकेने सहा जणांसोबत लग्न करून त्यांना लाखो रुपयांना चुना लावला आहे. 'मॅच मेकिंग' या लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून एका प्राध्यापिकेने सहा जणांना गंडवल्याचे समोर आले आहे. सहा लग्न करून पतींकडून लाखो रुपये उकळणाऱ्या महिलेल्या मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिलेने लग्न करून फसवलेल्या पुरुषांना धमकवण्यापर्यंत तिने सर्व प्रकार अवलंबले. विविध नाव धारण करून ही महिला घटस्फोटीत तरुणांना हेरायची. लग्न करून काही दिवसांतच घटस्फोट घेत होती. नंतर या लोकांकडून लाखो रुपयेही उकळत होती.

काय आहे हे प्रकरण?

नागपुरच्या जरीपटका भागात राहणारी समीरा फातीमा ही मोमीनपुऱ्यातील एका कॉलेजात प्राध्यापिका आहे. पण पैशाच्या हव्यासापोटी तिने सहा पुरुषांसोबत लग्न केले आणि त्यांना धमकावून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. दुसऱ्यांदा विवाहोत्सुक लोकांसाठी असलेली मॅच मेकिंग वेबसाईट 'सेकंड शादी डॉट कॉम'चा तिने पुन्हा पुन्हा लग्न करण्यासाठी वापर केला.

मानकापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वझीर शेख यांनी सांगितले की, आरोपी महिला घटस्फोटीत आहे. 2013 मध्ये तिने यशोधरा नगरातील नजमून शाकीब यासोबत लग्न केले होते. नंतर 'सेकंड शादी डॉट कॉम'वर औरंगाबादच्या मुदस्सर मोमीन भेटून तिने लग्न केले. अशाप्रकारे तिने सहा लग्न केले. नंतर त्यांच्याकडून पैसे उकळले. मॅच मेकिंग साईटवरून ओळख झाल्यावर लग्नानंतर ही महिला त्या पुरुषाला धमकावतही होती. विविध प्रकारचे गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल करत होती. शिवाय तिने लोकांना धमकावण्यासाठी टोळी बनविली होती. या टोळीत काही बोगस पोलिस होते. स्थानिक राजकारणी होते. समीराने लग्न करून फसविलेल्या लोकांमध्ये व्यापारी, अधिकारी आणि डॉक्टरही आहेत. आरोपी महिलेने एक टोळी सुरू केली होती. यात बनावट पोलिसही आहे. डॉक्टर लोकांनाही फसवणूक केली आहे. आम्ही या प्रकरणात आणखी तपास सुरु केला आहे.

Loading...

अश्लील फोटो काढून केली व्हायरल करण्याची धमकी...

आरोपी समिरा हिने मुदस्सर नावाच्या एका व्यक्तीला हॉटेलमध्ये नेऊन दारू पाजली. त्याच्यासोबत अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. नंतर ते व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपी महिलेन लग्न करून फसविलेल्या पुरुषांना धमकविण्यासाठी सर्व प्रकार अवलंबले होते. प्रसंगी आरोपी महिलेन बवावट शासकीय प्रमाणपत्रही मिळवले होते. पण अशा साईट्स चालविणाऱ्यांची अशा गुन्हेगारी मनोवृत्तीच्या लोकांना रोकण्याची जबाबदारी नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा साईट्सवर जाण्याआधी प्रोफाइल पाहूनच पुढे जाण्याचा सल्ला दिला जात आहे. जर अशी फसवणूक कुणाची झाली असेल तर पोलिसांकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

VIDEO: माणुसकी यांना माहीतच नसेल, रुग्णाचा तासभर तडफडून मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 1, 2019 04:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...