Elec-widget

राजकीय फायद्यासाठी प्रियांका गांधींवर झाली सर्जरी, या बातमीत तथ्य किती?

प्रियांका गांधींचा चेहरा इंदिराजींसारखा दिसण्यासाठी सर्जरी केली असल्याचा दावा.

  • Share this:

प्रियांका गांधी यांच्या सक्रीय राजकारण प्रवेशाने सर्वच राजकीय पक्षांना धक्का बसला. त्यांच्या राजकारणात येण्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची चर्चा आहे. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींसारखं दिसणं यामुळं त्यांनी राजकारणात येण्यासाठी कार्यकर्त्यांकडून वारंवार मागणी होत होती.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांच्याकडे पक्षाच्या महासचिव पदाची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान सोशल मीडियावर प्रियंका गांधींचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात त्यांच्या प्रियांका गांधी आणि इंदिरा गांधी यांच्यात दिसणारं साम्य यावर चर्चा केली आहे.

व्हिडिओशिवाय एक पोस्टही व्हायरल होत आहे. त्यात दावा करण्यात आला आहे की, प्रियांका गांधींनी इंदिराजींसारखं दिसण्यासाठी सर्जरी केली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर 10 ते 12 सर्जरी केल्याचं यात म्हटलं आहे.

Loading...

प्रियांका गांधींचे नाक, ओठ लहानपणी इंदिरा गांधींसारखे दिसत नव्हते. त्या इंदिरा गांधींसारख्या दिसाव्यात यासाठी सर्जरी करण्यात आल्याचा दावा व्हिडीओत करण्यात आला आहे. निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी असं केल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओत प्रियांका गांधींचा लहानपणीचा फोटो आणि सध्याचा फोटो जुळवून दाखवला आहे. यात लहानपणी सामान्य दिसणारे नाक आणि सध्याचे नाक यात झालेला बदल सर्जरीने झाल्याचा दावा केला आहे.

याबाबत न्यूज इंडिया 18 ने सत्य तपासण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रियांका गांधींच्या आधीच्या आणि आताच्या फोटोतील नाकात फरक दिसला. मात्र ते सर्जरीमुळे नव्हे तर वयामुळे असल्याचे समोर आले आहे.

याबाबत मुंबईतील के ई एम रुग्णालयात कान, नाक, घसा तज्ज्ञांना विचारलं असता त्यांनी सर्जरीशिवाय नाकाच्या आकारात बदल होऊ शकतो असं म्हटलं आहे. वयानुसार असे बदल होत असतात. चेहऱ्यावरची चरबी कमी झाल्यास नाक लहान-मोठे दिसते.

डॉक्टरांनी सांगितले की वयाच्या 16 व्या वर्षांपर्यंत नाकाचा आकार बदलतो. अनेकदा नाकाचे हाड वाढते आणि नाकाची लांबीही वाढते. याशिवाय गालही कमी-जास्त फुगतात. यासाठी सर्जरीच करावी लागते असं नाही.

आपण प्रियांकाला लहानपणापासून पाहिलं आहे मात्र कधीही सर्जरीबद्दल ऐकलं नसल्याचे सांगताना सोशल मिडियावर केला जाणारा दावा खोटा असल्याचं राजकीय विश्लेषक शेषनारायण सिंह म्हटलं.

प्रियांका गांधींचा चेहरा इंदिराजींसारखा दिसण्यासाठी सर्जरी केली असल्याचा दावा खोटा असल्याचंच यातून समोर आलं. त्यांच्या चेहऱ्यात झालेले बदल हे वयानुसार झाले असून त्यांनी कोणतीही सर्जरी केलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 4, 2019 01:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...