Home /News /news /

Prayagraj : प्रियंका गांधींनी पोस्ट केला मृतदेहांच्या अवहेलनेचा आणखी एक व्हिडिओ, पाहा पुरलेल्या मृतदेहांबरोबर काय सुरुय!

Prayagraj : प्रियंका गांधींनी पोस्ट केला मृतदेहांच्या अवहेलनेचा आणखी एक व्हिडिओ, पाहा पुरलेल्या मृतदेहांबरोबर काय सुरुय!

Prayagraj corona dead bodies हे कसलं स्वच्छता अभियान आहे, असं प्रियंका गांधींनी म्हटलं आहे. हा मृतांचा, धर्माचा आणि मानवतेचा अनादर आहे, अशी भावना प्रियंका गांधींनी व्यक्त केली आहे.

    लखनऊ, 25 मे : उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) कोरोनामुळं मृत्यू झालेल्या मृतांच्या पार्थिवाची (Disrespect of dead bodies) अवहेलना झाल्याचे काही व्हिडिओ (Video) समोर आले होते. काही मृतदेह थेट गंगेत सोडण्यात आले तर अनेकांचे मृतदेह गंगेच्या घाटावर पुरण्यात आल्याचंही पाहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी मृतदेहांची अवहेलना झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता प्रियंका गांधी यांनी प्रयागराजमधील (Prayagraj) एक व्हिडिओ पोस्ट करत या मृतदेहांची अवहेलना सुरुच असल्याचं म्हटलंय. या मृतदेहांवर टाकलेलं अंतिम वस्त्र म्हणजे रामनामीही (Ramnami) काढून घेतले जात असल्याचं प्रियंका गांधींनी म्हटलं आहे. (वाचा-...तर रुग्णाला फुलांमुळेही जीवघेण्या आजाराचा धोका; डॉक्टरांनी केलं सावध) प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करताना अत्यंत भावनिक अशी पोस्ट केली आहे. जीवंतपणी यांना चांगला उपचार मिळाला नाही. त्यानंतर अनेकांना सन्मानपूर्वक अंत्यविधीही मृत्यूनंतर प्राप्त झाला नाही. सरकारी आकडेवारीतही जागा मिळाली नाही, आणि आता यांची रामनामीही यांच्यापासून हिसकावली जात आहे, असं प्रियंका गांधींनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केवळ प्रतिमा चांगली करण्यासाठी सरकार पाप करत आहे. हे कसलं स्वच्छता अभियान आहे, असं प्रियंका गांधींनी म्हटलं आहे. हा मृतांचा, धर्माचा आणि मानवतेचा अनादर आहे, अशी भावना प्रियंका गांधींनी व्यक्त केली आहे. काय आहे व्हिडिओमध्ये? प्रयागराजमध्ये नदीच्या किनाऱ्यावर गेल्या दीड वर्षामध्ये अनेक मृतांचे पार्थिव पुरण्यात आले आहेत. अजूनही काही मृतदेह पुरते जात असल्याचा दावा केला जात आहे. मृतदेह पुरल्याचं लक्षात यावं यासाठी याठिकाणी मृतदेहांच्या चारही बाजुला बांबू उभे केले आहेत. तसेच यावर रामनाम लिहिलेलं वस्त्रही चढवलेलं असतं. पण हे वस्त्र काढून नेले जात असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. सोशल मीडियावर तर केवळ किती मृतदेह पुरले हे कळू नये किंवा मोजता येऊ नये म्हणून हे वस्त्र काढून नेले जात असल्याचा आरोप केला जात आहे. (वाचा-कोरोनाबाधित बाळासाठी आईनं केलं जीवाचं रान; PPE किट घालून कोविड वॉर्डात ठोकला मुक्काम) उत्तर प्रदेशात गंगेमध्ये मृतदेह सोडून दिल्यानं आणि काही ठिकाणी घाटावर मृतदेह पुरल्यानं एकच खळबळ उडाली होती. मृतदेहांचा हा अपमान असल्याचं सांगत सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर हा प्रकार म्हणजे अधिक गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. प्रियंका यांनी ट्विट करून अखेरच्या क्षणी त्यांच्याजवळची रामनामी तरी हिसकावू नका असं म्हटलं. कोरोनाच्या या संकटात मरण तर स्वस्त झालंच पण मरणानंतरच्या अशा यातनांना काय म्हणणार? असा आणखी एक भला मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Uttar pradesh news

    पुढील बातम्या