मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Priyanka Chopra: हॉलिवूड अभिनेत्रीचं भीषण कार अपघातात निधन; प्रियांका चोप्रावर शोककळा

Priyanka Chopra: हॉलिवूड अभिनेत्रीचं भीषण कार अपघातात निधन; प्रियांका चोप्रावर शोककळा

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एनी हेचे हिचं निधन झाल्यानं हॉलिवूडवर शोकळा पसरली आहे. तिच्या मृत्यूमुळे बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला देखील दु:ख झालं असून तिनं श्रद्धांजली वाहत भावूक पोस्ट शेअर केली आहे.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 13 ऑगस्ट: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर असताना दुसरीकडे हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एनी हेचे हिचं वयाच्या 53व्या वर्षी दु:ख निधन झालं आहे. मागील आठवड्यातच हेचे हिचं लॉस एंजेलिसमध्ये भीषण कार अपघात झाला. तिची कार एका भिंतीला जोरात आपटली आणि कारनं पेट घेतला त्यात हेचे गंभीररित्या भाजली आणि सहा दिवसांची तिची झुंज अखेर अपयशी ठरली. डॉक्टर तिचा जीव वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करत होते. मात्र आज तिची प्राणज्योत मालवली. हॉलिवूडमधील ती प्रसिद्ध अभिनेत्री होती. अनदर वर्ल्ड ही तिची सीरिज प्रचंड गाजली. तिच्या जाण्यानं हॉलिवूडवर शोकळा पसरली आहे. केवळ हॉलिवूडच नाही बॉलिवूड अभिनेत्रीनं देखील हेचे हिच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. हेचे हिची मैत्रीम नॅन्सी डेव्हिस हिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. निधनाची बातमी ऐकताच बॉलिवूड अभिनेत्री देसी गर्ल प्रियांका चोप्राला मोठा शॉक बसला. प्रियांकानं  हेचे बरोबर काम केलं होतं. दोघींची चांगली मैत्री होती. तिच्या निधनानं प्रियांकाला देखील प्रियांकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचं दु:ख व्यक्त केलं आहे. प्रियाकांनं म्हटलंय, 'एनीची मुलं, परिवार, मित्र मैत्रिणी याच्यासाठी दु:ख व्यक्त करणाऱ्या सर्वांप्रती माझ्या संवेदना. एनी तुला ओळखणं आणि तुझ्याबरोबर काम करणं हा मी माझा सन्मान समजते. तू एक सुंदर व्यक्ती होती. त्याचप्रमाणे एक अविश्वसनीय अभिनेत्री देखील होतीस. तुझ्यासाठी माझ्या हृदयात नेहमीच जागा असेल. रेस्ट इन पॉव्हर एने!' हेही वाचा - Amitabh Bachchan: अमिताभ यांचं गिफ्ट राजू श्रीवास्तव यांच्यासाठी ठरणार रामबाण औषध? पाठवला खास ऑडिओ हेचे हिनं हॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध सीरिज आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'अनदर वर्ल्ड' ही तिची सर्वाधिक गाजलेली  सीरिज आहे. यात तिनं डबल रोल करत विकी हडसन आणि मार्ली लव्ह ही पात्र साकारली होती.  तिच्या निधानानं सर्वच स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. ऐनी हेचे हिचा 5 ऑगस्टला भीषण कार अपघात झाला. अपघातात तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तिच्या जगण्याची कोणचीच उमेद शिल्लक नाही असं तिच्या रिप्रेजेंटेटिव्हनं सांगितलं होतं. तिची ब्रेन सर्जरी करण्यात आली. पाच दिवस तिला लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आलं होतं. पण जगण्याची कोणतीच आशा दिसत नसल्यानं तिच्या सपोर्ट सिस्टिम काढून टाकण्यात आल्या आणि काही वेळातच तिनं जीव सोडला.  मृत्यूनंतर तिचे अवयवही दान करण्यात आलेत.
First published:

पुढील बातम्या