मला भारतात लग्न करायचं नव्हतं, निकसाठी केलं; प्रियांका चोप्राचा मोठा खुलासा

मला भारतात लग्न करायचं नव्हतं, निकसाठी केलं; प्रियांका चोप्राचा मोठा खुलासा

मला एका खासगी आयलँडवर लग्न करण्याची इच्छा होती. सेशेल्स, मालदीव किंवा मोरिशसमध्ये लग्न करण्याची इच्छा होती.

  • Share this:

प्रियांका चोप्रा सध्या अमेरिकेत पती निक जोनससोबत राहते. यावेळी ती अनेक अमेरिकी टीव्ही शोमध्ये गेली होती. प्रियांकाने पाचव्यांदा या परदेशी चॅट शोमध्ये सहभाग घेतला आहे. यावेळी प्रियांकाने आपल्या लग्नाचे अनेक किस्से सांगितले. प्रियांकाने लग्नाच्या प्लॅनिंगवरून ते लग्नाचं ठिकाण निश्चित करण्यापर्यंतचे अनेक किस्से सांगितले.

प्रियांका नुकतीच जिम्मी फॅलेन या प्रसिद्ध चॅट शोमध्ये गेली होती. यावेळी जिमीने प्रियांकाला तिच्या लग्नाबद्दलचेच जास्त प्रश्न विचारले.

प्रियांका म्हणाली की, मला एका खासगी आयलँडवर लग्न करण्याची इच्छा होती. सेशेल्स, मालदीव किंवा मोरिशसमध्ये लग्न करण्याची इच्छा होती. पण निकच म्हणाला की भारतात लग्न करू. कारण की निकला त्याच्या नवरीला अर्थात मला भारतातूनच सासरी न्यायचं होतं. राजस्थानमध्ये लग्न करण्याची कल्पना त्याची होती.

यानंतर जिम्मीने प्रियांकाला इन्स्टाग्रामवरचा अजून एक फोटो दाखवत प्रश्न विचारला. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा फोटो प्रियांकाच्या चुलत बहिणीने क्लिक केला होता. प्रियांकाने स्वतः याबद्दल स्पष्टीकरण दिले.

जिम्मीने प्रियांका आणि निकच्या घरासंदर्भातलेही अनेक प्रश्न विचारले.

यावर बोलताना प्रियांका म्हणाली की, ‘खूप दिवस मी माझ्या घरी गेली नाही. त्यामुळे आता माझ्या घराच्या सगळ्या गोष्टी बंद पडल्या आहेत. साधी कॉफी मशिनही चालत नाही. एसीमधून फार आवाज येतो तर दाराबाहेरची घंटीही वाजत नाही. पण तरी माझं घर खूप सुंदर आहे. जेव्हा मी निकच्या घरी गेली तेव्हा मी थोडी तणावात होती. तिकडे प्रत्येक गोष्ट योग्य ठेवली होती आणि खूप स्वच्छता होती.'

'कधी कंटाळा आला तर माझी इच्छा होते की चपला सहज बाजूला फेकाव्यात. पण त्याच्या घरची स्वच्छता पाहून मलाच भिती वाटते.’ लवकरच प्रियांका हॉलिवूड सिनेमा इझंट इट रोमँटिकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १३ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

First published: February 7, 2019, 12:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading