…म्हणून प्रियांकाने करण जोहरला मुद्दाम तिच्या लग्नात बोलावलं नाही

…म्हणून प्रियांकाने करण जोहरला मुद्दाम तिच्या लग्नात बोलावलं नाही

प्रियांका आणि निकचं लग्न १ डिसेंबरला उमेद भवन पॅलेसमध्ये राजेशाही थाटात पार पडलं होतं. या लग्नात एकाही बॉलिवूडच्या स्टारला आमंत्रण देण्यात आलं नव्हतं.

  • Share this:

मुंबई, २५ फेब्रुवारी २०१९- स्टार वर्ल्डवर येणाऱ्या कॉफी विथ करण ६ च्या शेवटच्या एपिसोडमध्ये करिना कपूर आणि प्रियांका चोप्रा आल्या होत्या. यावेळी दोघांनी आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. याचवेळी करणने त्याला प्रियांका चोप्राने लग्नात न बोलावल्यामुळे नाराज असल्याचे सांगितले.

संपूर्ण शोमध्ये करणने लग्नात न बोलवण्यावरून प्रियांकाला टोमणे मारले. यानंतर प्रियांकाने करणला लग्नात न बोलवण्याचं कारण सांगून टाकलं. प्रियांका म्हणाली की, करणला सतत सेल्फी काढण्याची सवय आहे. त्याला प्रत्येकासोबत फोटो काढायचा असतो. प्रियांकाला तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल व्हावे अशी अजिबात इच्छा नव्हती. यामुळे प्रियांकाने करणला लग्नाला न बोलावण्याचा निर्णय घेतला. प्रियांकाच्या या उत्तरानंतर करिनाने करणची खूप थट्टा उडवली.

प्रियांका हेही म्हणाली की, तिच्या आणि निकच्या लग्नात मोबाइल पोलिसांचाही बंदोबस्त करण्यात आला होता. लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांचे फोन एका झिप लॉक बॅगमध्ये जमा करण्यात आले होते. यामुळे कोणतेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली होती.

प्रियांका आणि निकचं लग्न १ डिसेंबरला उमेद भवन पॅलेसमध्ये राजेशाही थाटात पार पडलं होतं. या लग्नात एकाही बॉलिवूडच्या स्टारला आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. शोमध्ये करणने प्रियांकाला निकबद्दल अनेक मजेशीर प्रश्न विचारले. त्या प्रश्नाची उत्तरं देताना प्रियांका फार लाजताना दिसली. प्रियांकाने सांगितलं की निकने तिला पहिल्यांदा ग्रीसमध्ये रोमँटिक अंदाजात प्रपोज केलं होतं. यानंतर तिने निकला लग्नासाठी होकार दिला होता.

First published: February 25, 2019, 4:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading