Home /News /news /

स्टेजवर येताच प्रियांका-निकने केलं लिपलॉक KISS, दोघांची सिझलिंग केमिस्ट्री व्हायरल

स्टेजवर येताच प्रियांका-निकने केलं लिपलॉक KISS, दोघांची सिझलिंग केमिस्ट्री व्हायरल

एकमेकांना लिपलॉक किस करत प्रियांका आणि निकने अगदी रोमँटिक आणि खास पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे.

  नवी दिल्ली, 01 जानेवारी : बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत, सुंदर बॉन्डिंग, प्रेम आणि केमिस्ट्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा नवीन वर्ष साजरं करतानाचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला. प्रियांका आणि निक जोनस नव्या वर्षाचं स्वागत करताना एकमेकांना किस करतात आणि त्यांचा व्हिडिओ सध्या जगभर व्हायरल होत आहे. खरंतर निक आणि प्रियांता सगळ्यांसाठी कपल गोल आहेत अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. एकमेकांना लिपलॉक किस करत प्रियांका आणि निकने अगदी रोमँटिक आणि खास पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे. एकदा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी निक आणि प्रियांकाचा सिझलिंग आणि रोमँटिक व्हिडिओ इंटरनेटवर थिरकतो आहे. वास्तविक, निकच्या कॉन्सर्टनंतर प्रियंकाने लिपलॉक किस करत नवीन वर्षाचे स्वागत केले.
  खरंतर, 2019 च्या शेवटच्या रात्री निक त्याच्या भावांबरोबर मैफिलीत परफॉर्म करीत होता. मैफलीमध्ये निक ब्रदर्सही सामील झाले होते. मैफिल संपल्यानंतर निक आणि प्रियांकाने एकमेकांना लिपलॉक किस केलं आणि 2020 वर्षाचं जोरदार स्वागत केलं. निक आणि प्रियंकासोबतच निकच्या भावांनीही त्यांच्या जोडीदाराबरोबर लिपलॉक किस केलं.
  प्रियांका आणि निकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोघांमधील रोमँटिक किसचा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड  आवडत आहे. याआधीही प्रियांका आणि निकचे अनेक रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात दिसतात.
  Published by:Renuka Dhaybar
  First published:

  Tags: Actress priyanka chopra

  पुढील बातम्या