कोण आहे प्रियंकाचा 'फेव्हरेट मॅन'?

प्रियंकाने निक आणि तिच्या भावाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय आणि त्याखाली माय 'फेव्हरेट मॅन' अशो ओळ लिहिली आहे.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2018 09:13 PM IST

कोण आहे प्रियंकाचा 'फेव्हरेट मॅन'?

मुंबई,ता.28 जून : हॉलिवूड गाजवणारी बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपला मित्र निक जोनस सोबत गोव्यात सुट्ट्या एंजॉय केलीय. दोघांच्या केमेस्ट्रीची चर्चा सध्या जोरदार सुरू असून दोघांनी अधिकृतपणे त्याविषयी काहीही सांगितलेलं नाही.

मात्र सोशल मीडियावरून त्यांनी दोघांच्या प्रेमाची पावती दिली आहे. प्रियंकाने निक आणि तिच्या भावाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय आणि त्याखाली माय 'फेव्हरेट मॅन' अशो ओळ लिहिली आहे. या फोटोत निक आणि तिचा भाऊ पाठमोरा दिसत असून दोघही समुद्राकडे पाहत आहेत. निकसाठीच प्रियंकाने माय फेव्हरेट मॅन असं लिहिलं हे वेगळं सांगण्याची काही गरज नाही.

प्रियंका निकला घेऊन काही दिवसांपूर्वीच मुंबईत आली होती. प्रियंकाने तिची आई मधू चोप्राशी निकची भेट घालून दिली अशी चर्चा आहे. आईचा ग्रीन सिंग्नल मिळाल्यावर निक-प्रियंकाची एंगेजमेंट होणार आहे.

कॉन्टिको या गाजत असलेल्या मालिकेत प्रियंकाची मुख्य भूमिका आहे. कॉन्टिकोच्या सेटवर प्रियंकाची निक जोनसशी ओळख झाली आणि पुढे मैत्री. 25 वर्षांचा निक हा गायक असून प्रियंकापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. मात्र अनेक कार्यक्रमांमध्ये दोघ एकत्र सहभागी होतात आणि त्यांच्यातली केमेस्ट्रीही लक्षवेधी असते. त्यामुळं लवकरच दोघांची गुड न्यूज आली तर आश्चर्य वाटणार नाही.

हेही वाचा...

Loading...

 हम फिट तो इंडिया फिट, सचिन तेंडुलकरनं दिलं फिटनेस चॅलेंज

हिंदी 'झिंगाट'वर टीकेचा भडिमार!, तुम्ही हे गाणं ऐकलंत का?

 'संजू'चं काऊंटडाऊन सुरू, चार हजार स्क्रीन्समध्ये सिनेमा!

नीतू सिंगच्या वाढदिवसाला आलियाला निमंत्रण

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2018 09:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...